ग्रामपंचायतींशी ‘संविधान’ची मैत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मंडणगड - सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मैत्री फाउंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १८४ व्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्‍यातील सर्व ४९ ग्रामपंचायतींना भारताच्या संविधान प्रतींचे ग्रामसेवकांना वाटप केले. हा कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात झाला.

या वेळी नगराध्यक्षा श्रुती साळवी, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, मुख्याधिकारी कविता बोरकर, निवासी नायब तहसीलदार संजय कांबळे, सहायक गटविकास अधिकारी अरुण जाधव, मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज मर्चंडे, नगरसेवक आदेश मर्चंडे, सुभाष सापटे, कृषी विस्तार अधिकारी विशाल जाधव, ॲड. दयानंद कांबळे, मिलिंद लोखंडे, प्रा. शामराव वाघमारे व ग्रामसेवक उपस्थित होते.

ॲड. संविधानातील विविध बाबींवर प्रकाशझोत टाकला. देशातला प्रत्येक माणूस प्रतिष्ठित असून त्याचे उत्तर संविधानात आहे; मात्र सामाजिक अभिसरण आपण विसरून गेलो आहोत. देशातला प्रत्येक घटक शिक्षित झाला पाहिजे. संविधान देशाचा आत्मा असून देशाचा धर्मग्रंथ आहे. त्यासाठी त्यातील उद्देशिकेतला प्रत्येक शब्द समजावून घेतला पाहिजे. 

ग्रामसेवक समाजाचा कणा असून दिलेल्या संविधानाचे वाचन ग्रामसभेत व्हायला हवे असेही त्यांनी सांगितले. प्रा. वाघमारे म्हणाले की, तालुक्‍यात प्रथमच संविधानाचे वाटप करण्यात आले असून उपेक्षित वर्गाला सर्वांच्या बरोबरीने घेऊन जाण्याचे काम संविधानाने केले आहे. मानव मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे संविधान; मात्र आजही आपण संविधानाच्या बाबतीत सजग, साक्षर आहोत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: grampanchyat sanvidhan friendship