सायकल सफर करत आजोबा कोकणात

६०० किमी अंतर पार; मुकुंद कडूसकर, जयंत रिसबूड यांचा व्यायामाचा संदेश
ratnagiri
ratnagirisakal
Summary

६०० किमी अंतर पार; मुकुंद कडूसकर, जयंत रिसबूड यांचा व्यायामाचा संदेश

रत्नागिरी : सेवानिवृत्तीनंतर सायकलच्या प्रेमात(cycle ride) पडलेल्या ७२ वर्षांच्या दोघांनी सायकल सफरी सुरू केल्या. नोव्हेंबरमध्ये चार दिवसांत तीनशे किलोमीटरचा टप्पा पार केल्यावर त्यांनी मिशन कोकण(mission kokan) सुरू केले. मजल दरमजल करत त्यांनी सहाशे किलोमीटरचा टप्पा ओलांडून रत्नागिरीत प्रवेश केला. युवकांनी व्यायामाकडे(exercise) वळले पाहिजे. सायकलिंग हा सर्वांत उपयुक्त व्यायाम आहे, असा संदेश देत हे सायकलपटू कोल्हापूरला रवाना झाले. मुकुंद कडूसकर आणि जयंत रिसबूड अशी या दोघा सायकलपटूंची नावे आहेत.

ratnagiri
नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी १०६ जागा

कोकणचे अद्वितीय निसर्गसौंदर्य निरखित कोकणच्या माणसांची भेट घेत त्यांचा प्रवास सुरू आहे. येथे संवाद साधताना आनंद होत असल्याचे दोघांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सकाळी ७ वाजता चहा, नाश्ता घेऊनच प्रवासाला सुरुवात करतो. दुपारी हलका आहार घेतो. दिवसभरात सुमारे ७० ते ८० किमीचे अंतर पार करतो. काळोख पडला की तिथे वास्तव्य व पुरेसे जेवण घेतो. भक्तनिवासात व अन्य ठिकाणी उपलब्ध खोलीत वास्तव्य केले. सायकलचे स्पेअर पार्टस्, हवा भरण्यासाठी पंप सोबत आहे.

कडूसकर यांनी कॉलेजमध्ये असताना सायकलवरून दोन हजार किमीचा पल्ला गाठला होता. नंतर २५ वर्षे अबुधाबी, नायजेरिया या देशांमध्ये प्रिंटिंग व्यवसाय केला तेथे सायकलिंग क्लबमध्ये सहभाग घेतला. नियमित २० ते ५० किमीचे अंतर ते पार करत होते. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सायकलिंग सुरू केले. परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारिता, मुद्रण प्रकाशमध्ये संपादक म्हणून सेवा बजावली. विविध वृत्तपत्रांतही ते लेखन करत होते.जयंत रिसबुड हे किर्लोस्कर कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते पूर्वी कंपनीत सायकलनेच जात होते. नंतर ही सवय मोडली. परंतु ३० वर्षे ट्रेकिंग करत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील ९१ किल्ले, हिमालयात ६ वेळा ट्रेकिंग केले आहे. निसर्गात जायचे व त्यामुळेच तब्बेत चांगली राहते, हा संदेश सायकल सफरीतून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ratnagiri
नाशिक : चार्जिंग स्टेशनसाठी ‘रिलायन्स’, मात्र मनपाला हवाय ‘टाटा’

एक नजर

  1. मुकुंद कडूसकर, जयंत रिसबूड ही दुक्कल

  2. सकाळी ७ वाजता सफर सुरू

  3. दिवसभरात ८० किमी अंतर पार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com