
ब्रिटिश राजवटीत, भारताची शेतीव्यवस्था ही शोषणामुळे खिळखिळी झाली होती. परिणामी, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या काळात अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही वारंवार पडणारा दुष्काळ अथवा अतिवृष्टी यासारख्या समस्यांना बळी पडली. या पार्श्वभूमीवर कृषी विकास धोरण म्हणून भारतात हरितक्रांती राबवली गेली. हरितक्रांतीमध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या संकरित जातींचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला गेला. त्यामुळे भारतातील आदिम बियाणी प्रामुख्याने नष्ट झाली. भारतातील शाश्वत शेतीपद्धती ज्यात बियाणी सांभाळली जायची त्याऐवजी बाजारातून बियाणी आणली जाऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची स्वत:ची बियाणी साठवणे बंद केले. यातून आदिम बियाणी संपून गेली.
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी सृष्टिज्ञान संस्था