
Guardian Minister Nitish Rane addressing citizens about the upcoming development plan for Devgad.
Sakal
देवगड: येथील संभाव्य शहर प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांनी कोणतीही शंका मनात न बाळगता निश्चित रहावे. नागरिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. आदर्श शहर बनवण्यासाठी उत्कृष्ट आराखडा बनवू, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथील नागरिकांना आश्वासित केले. याचवेळी आराखड्याबाबत आपल्या हरकती नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले.