शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी, पालघरचे पालकमंत्री उतरले शेतात

paalghar
paalghar

मोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा यांनी जिल्हयातील दुष्काळ सदृश्य स्थिती पाहण्याचे दौरे सुरू केले आहेत. त्यांनी अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी, गावोगावी भेटी देत थेट शेतात उतरून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. जिल्ह्य़ात सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती असुन, त्यामध्ये मोखाडा तालुक्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी शेताच्या बांधावरच अधिकार्यांची बैठक घेऊन, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी, सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

पालघर जिल्हयात सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारल्याने संपूर्ण खरीप हंगाम करपुन गेला आहे. आदिवासी तालुक्यांमध्ये ऐकमेव केवळ खरिपाचेच पीक घेतले जाते. त्यामुळे यावर्षी संपूर्ण जिल्ह्य़ात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार पालकमंत्री विष्णु सवरा यांनी जिल्हयातील दुष्काळ सदृश्य स्थिती पाहण्याचे दौरे सुरू केले आहेत. त्यांनी तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यातील शेशेतीच्या प्रत्यक्ष स्थितीची, शेतात ऊतरून पाहणी केली आहे. 

त्यांनी मोखाड्यातील सुर्यमाळ, किनिस्ते, धामनशेत, कोशीमशेत , शेंड्याचीमेट, खोच आणि टाकपाडा येथील पिकांची शेतात उतरून पाहणी केली आहे. मोखाड्यातील पिकांची गंभीर स्थिती असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे. यावेळी शेतकर्यांनी डोळ्यात अश्रू आणत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. येथे पिकांच्या ऐवजी आमच्या हातात, गवतच येणार असल्याचे सवरा यांना शेतकर्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आपण वास्तव अनुभवले आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहे. तसेच त्यानंतर प्रशासनाकडुन पाहणी आणि पंचनामे करण्यात येतील तसे आदेश लवकरच देण्यात येणार असल्याचे सवरा यांनी शेतकर्यांना सांगुन दिलासा दिला आहे. तर मोखाडा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा अशी मागणी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी सवरा यांना निवेदन देऊन केली आहे.
 
दरम्यान, मोखाड्यात आगामी काळात दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे, अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कुपोषण, पाणी टंचाई, रोजगार, आणि स्थलांतर याबाबी असणार आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजनांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश सवरा यांनी अधिकार्यांची शेताच्या बांधावरच बैठक घेऊन दिले आहेत. तसेच ज्याठिकाणी सद्यस्थितीत पाण्याचे झरे वाहतात, त्याठिकाणी, तातडीने मातीचे बंधारे, नरेगा अंतर्गत सुरू करून आदिवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आदेश सवरांनी दिले आहेत. तर मोखाडा तालुक्याला जिल्हा नियोजनातुन भरीव निधी उपलब्ध करून देणार असून विशेष बाब म्हणून, शासनाकडून ही निधी ऊपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

या दौऱ्यात मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे, तहसीलदार बी एम केतकर, गटविकास अधिकारी संगिता भांगरे, तालुका कृषी अधिकारी बालाजी सूर्यवंशी यांसह भाजप मोखाडा तालुका अध्यक्ष रघुवीर डिंगोरे, युवा मोर्चा विद्यार्थी अध्यक्ष उमेश येलमामे, विठ्ठल चोथे, पंचायत समिती सदस्या नाजुका भोवर आदी सहभागी झाले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com