गुढीपाडव्याची शोभायात्रा जल्लोषात निघणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

१३ वे वर्ष - ८० चित्ररथ, संस्था सहभागी होणार

रत्नागिरी - ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्थेच्या वतीने सलग १३ व्या वर्षी गुढीपाडवा शोभायात्रा जल्लोषात काढण्यात येणार आहे. यामध्ये ७० ते ८० चित्ररथ आणि मंदिर संस्था, सामाजिक संस्था व हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता. ५) सायंकाळी पतितपावन मंदिरात पहिली बैठक घेण्यात आली. या बैठकीला १०० लोक उपस्थित होते.

या बैठकीमध्ये गतवर्षीच्या शोभायात्रेचा आढावा घेण्यात आला. येत्या २८ मार्चला गुढीपाडवा आहे. ग्रामदेवता मंदिर ते समाजमंदिर या संकल्पनेनुसार भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरपर्यंत शोभायात्रा काढण्यात येते. या दिवशी सकाळी ९ वाजता ग्रामदैवत भैरीबुवाच्या प्रांगणात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून ९.३० वाजता यात्रेला सुरवात होणार आहे.

पारंपरिक वेशभूषेत सर्व हिंदू बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे याकरिता अनेक संस्थांशी संपर्क साधण्यात येणार आहे. गतवर्षी सुमारे ७० संस्थांचे रथ, प्रतिनिधी सहभागी झाले होते. या संस्थांमध्ये वाढ व्हावी याकरिता जबाबदारी देण्यात आली. शोभायात्रेच्या वातावरणनिर्मितीसाठी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.

बैठकीला श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे, पतितपावन मंदिराचे अध्यक्ष ॲड. बाबा परुळेकर, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष आनंद मराठे, मोहन भावे, प्रवीण जोशी, दिनकर जोशी, प्रकाश घुडे, संतोष भाटकर, महेंद्र मयेकर, विनायक हातखंबकर, सुधाकर सावंत, गोविंदभाई पटेल, सुशांत चवंडे, दीपक सुर्वे, उल्हास लांजेकर, प्रकाश विलणकर, जितेंद्र भोंगले, दत्तात्रय साळवी, शेखर पिंपुटकर, उजय पेठे आदींसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी होते.

Web Title: gudhipadava shobhayatra