Konkan News : गुहागरमध्ये 446 जणांना विंचवाचा डंख; 92 सर्पदंश, 323 श्वानदंशांचीही नोंद

गुहागर तालुक्यात (Guhagar) चालू वर्षात सुमारे ४४६ जणांना विंचूदंशाची लागण झाली.
Scorpion Snake
Scorpion Snakeesakal
Summary

ऑक्टोबर ते मे असा उन्हाचा हंगाम असल्याने या दरम्यान ग्रामीण भागात विंचूदंशाचे प्रमाण वाढते असते.

गुहागर : तालुक्यात (Guhagar) चालू वर्षात सुमारे ४४६ जणांना विंचूदंशाची लागण झाली असून, ९२ जणांना सर्पदंश लागण झाली तर ३२३ जणांना श्वानदंश झाल्याची माहिती तालुका आरोग्य (Health Department) अधिकारी डॉ. जांगिड यांनी दिली.

Scorpion Snake
Kolhapur : नोकरी, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींवर अत्याचार; 632 महिला, 332 मुली बेपत्ता, चाकणकर अॅक्शन मोडवर..

सुदैवाने, वर्षभरात विविध प्रकारच्या कोणत्याही दंशामध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य असल्याने वेळेत योग्य ते उपचार झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ग्रामीण भागात साधारणतः भातकापणी हंगामात विंचू व सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते.

साधारणतः ऑक्टोबर ते मे असा उन्हाचा हंगाम असल्याने या दरम्यान ग्रामीण भागात विंचूदंशाचे प्रमाण वाढते असते. यावर्षी गुहागर तालुक्यात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत सर्प, विंचू, कुत्रा आणि इतर दंश आकडेवारी गुहागर तालुका आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

Scorpion Snake
Gruha Jyothi Scheme : गृहज्योती योजनेसाठी तब्बल एक कोटी अर्ज दाखल; 200 युनिट वीज मिळणार मोफत

यामध्ये तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या आकडेवारीनुसार तळवली प्राथमिक आरोग्यकेंद्रात ९ जणांना सर्पदंश, १७९ जणांना विंचूदंश, ६५ जणांना श्वानदंश, हेदवी प्राथमिक आरोग्यकेंद्रात २१ जणांना सर्पदंश, ८७ जणांना विंचूदंश, ६१ जणांना श्वानदंश, ४१ जणांना इतर दंश झाला आहे. कोळवली प्राथमिक आरोग्यकेंद्रात २ जणांना सर्पदंश, ७ जणांना विंचूदंश, २२ जणांना श्वानदंश तर २४ जणांना इतरदंश झाला.

Scorpion Snake
Child Marriage : कोवळ्या हातांना लावली जातेय हळद! धक्कादायक आकडे समोर; सांगलीत 62 बालविवाह रोखले
Scorpion Snake
Scorpion Snakeesakal

आबलोली प्राथमिक आरोग्यकेंद्रात ५१ जणांना सर्पदंश, ११४ जणांना विंचूदंश, १०९ जणांना श्वानदंश, ८५ जणांना इतरदंश झाला. चिखली प्राथमिक आरोग्यकेंद्रात ९ जणांना सर्पदंश, ५९ जणांना विंचूदंश, ६६ जणांना श्वानदंश, १७ जणांना मांजर दंश, एकाला माकड दंश तर २९ जणांना इतर दंश झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com