पर्यावरणस्नेही उपक्रमात ‘एक्‍सेल’ अग्रेसर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

गुहागर - एक्‍सेल उद्योग समूह आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास आणि शेती ही सप्तपदी घेऊन उत्तर रत्नागिरीमध्ये काम करीत आहे. मूल्याधिष्ठित, पर्यावरणपूरक, राष्ट्रीय विचारांना पूरक, स्थानिक जनतेची सर्वांगीण उन्नती आणि बंधुत्वाचे नाते दृढ करणारे स्थायी काम उभे करणे हा एक्‍सेलच्या सप्तपदीचा मंत्र आहे. त्यासाठी एक्‍सेल उद्योगसमूहाने समर्थ ग्रामविकास ट्रस्ट (एस.जी.व्ही.टी.), विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (व्ही.आर.टी.आय.) या दोन संस्थांची उभारणी केली आहे.

गुहागर - एक्‍सेल उद्योग समूह आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास आणि शेती ही सप्तपदी घेऊन उत्तर रत्नागिरीमध्ये काम करीत आहे. मूल्याधिष्ठित, पर्यावरणपूरक, राष्ट्रीय विचारांना पूरक, स्थानिक जनतेची सर्वांगीण उन्नती आणि बंधुत्वाचे नाते दृढ करणारे स्थायी काम उभे करणे हा एक्‍सेलच्या सप्तपदीचा मंत्र आहे. त्यासाठी एक्‍सेल उद्योगसमूहाने समर्थ ग्रामविकास ट्रस्ट (एस.जी.व्ही.टी.), विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (व्ही.आर.टी.आय.) या दोन संस्थांची उभारणी केली आहे. एक्‍सेलने केलेल्या कामांची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट असल्याने शासनासह खेड, दापोलीतील अनेक संस्था व गावे एक्‍सेल परिवाराशी जोडली गेली आहेत. 

एक्‍सेलने जलसंवर्धनाचे काम करताना लोकसहभागालाही महत्त्व दिले. दाभिळ भोईवाडीत नळ-पाणीपुरवठा योजनेसाठी ४२ कुटुंबांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांचे योगदान दिले. शिवाय १ महिना श्रमदान केले. एक्‍सेल कंपनीने योजनेसाठी आवश्‍यक असणारे साहित्य, कौशल्य असणारे मनुष्यबळ दिले. त्यामधून ही योजना साकार झाली. कोतवली, केतकी भिले येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. चाळकेवाडीतील विहिरीची स्वच्छता आणि देखभाल एक्‍सेल  कंपनीने करून दिली. 

या योजनांचा फायदा ४ गावांतील १३२ कुटुंबाना आज होत आहे. शासनाच्या वनराई बंधारा अभियानात सहभागी होत बोरज, निगडे, तेर्लीवाडी गुणदे, आयनी, केतकी आदी गावातून १० वनराई बंधारे गावकऱ्यांसोबत काम करून  एक्‍सेलने बांधले. 

पर्यावरणपूरक सगुणा तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी आजपर्यंत २५ गावांत एक्‍सेलने जागरण केले आहे. त्यामधून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांनी ८ एकर जागेत सगुणा तंत्रज्ञानावर आधारित भातशेती सुरू केली आहे. कमी जागेत विविध प्रकारचा भाजीपाला कसा करता येतो याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाते. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे उत्कृष्ट बियाणे एक्‍सेल उपलब्ध करून देते.  आज ४५ शेतकरी अडीच एकर जागेत भाजीपाला करीत आहेत.

किचन गार्डन संकल्पना...
शेंगदाण्याचे पीक शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी १९ शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन ५ एकरमध्ये शेंगदाणा लागवड एक्‍सेलने यशस्वी करून दाखविली. या शेतांमध्ये अन्य शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी नेले. याशिवाय शेतकरी मेळाव्यांमधून वातावरणातील बदलानुरूप शेती, औषधांचा वापर, बीजारोपण याबाबतची माहिती एक्‍सेलच्या माध्यमातून दिली जाते. कमी जागेत देखील भाजीपाला करून शेतकरी उत्पन्न मिळवू शकतो, हा विचार रुजविण्यासाठी ‘किचन गार्डन‘ ही संकल्पना रुजविण्याचे काम एक्‍सेल करीत आहेत.

Web Title: guhagar news environment