१९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guhagar Taluka President Selection Kokan Marathi News

 भाजपच्या गुहागर तालुकाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची सभा गुहागरमध्ये झाली....

१९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा...

गुहागर (रत्नागिरी) : १९९९ नंतर शिवसेनेच्या नेत्यांची नियत बिघडत गेली. स्थानिक कार्यकर्ते आपल्यापासून कसे दूर जातील, याची व्यवस्था शिवसेनेने उभी केली. युती तुटल्यानंतर २००९ पासून पराभवाचे सत्र सुरू झाले. मतविभागणीमुळे विरोधकांचा विजय होत गेला. आता पुन्हा स्वतंत्रपणे लढण्यासाठी भाजपचे संघटन मजबूत होणे आवश्‍यक आहे. परंपरागत व्यवस्थाच ते करेल. कार्यकर्त्यांनी वेळ दिला तर संघटनात्मक ताकद वाढेल, असे प्रतिपादन प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी केले.

भाजपच्या गुहागर तालुकाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची सभा गुहागरमध्ये झाली. या सभेत डॉ. नातू म्हणाले, सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात अनेक चुकीच्या प्रथा पाडल्या गेल्या. त्याचा फटकाही सर्वांना बसला. त्यामुळे भाजपमध्ये पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, परंपराच पक्षाला तारून नेतील. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम असेल तर राजकीय यश मिळेल.

हेही वाचा- Republic Day 2020 : कोल्‍हापुरचा हा तरूण अभियंता फिरतोय संविधानाचे धडे घेऊन....

सीएए, एनपीआर आणि एनआरसीबाबत संभ्रम निर्माण केला जातोय......

त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. मोदी सरकारच्या अनेक योजनांचे लाभार्थी आज गावागावांत आहेत. तीन तलाकच्या निर्णयानंतर मुस्लिम महिला भाजपच्या जवळ आल्या. ३७० कलम, ३५ ए हे काश्‍मीरच्या हिताचे निर्णय झाले. राममंदिराचा निर्णय झाला. नागरिकत्व कायदा देशहिताचा आहे. तरीही सीएए, एनपीआर आणि एनआरसीबाबत संभ्रम निर्माण केला जातोय. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले जातात. या गोष्टी मतदारापर्यंत आपण पोचविल्या पाहिजेत.

हेही वाचा- Republic Day 2020 : येथून निघाले दोघे सायकलस्वार त्यांनी गाठले दिल्लीचे द्वार..

...तरच भाजपचा मताधार वाढेल
 बूथ कमिट्या, शक्ती केंद्र, विविध सेल, तालुका कार्यकारिणी या सर्वांच्या नियुक्‍त्यांमध्ये युवक वर्गाने योगदान द्यावे. मतदारांशी संवाद साधावा. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पाच वर्षात आलेल्या कार्यकर्त्यांसोबत बोलून पुन्हा जोडून घेण्याची प्रक्रिया सुरू करावी तरच भाजपचा मताधार वाढेल. हाच मताधार पराभवाची परंपरा मोडून काढेल,असे आवाहन नातू यानी केले.

हेही वाचा- अरे वा :  आता देवरुखात उडणार सुखोई, मिराज....

 नंतर चित्र बदलले. 
१९८९ पर्यंतच्या काळात मित्रपक्ष सोबत नसताना भाजपचा आमदार म्हणून तात्या निवडून येत होते. ९० नंतर युतीचे राजकारण सुरू झाल्यावर कोण ताटात आणि कोण वाटीत, असा विचार न करता आपण शिवसेनेला सोबत घेऊन काम केले. याच काळात गुहागरच्या पंचायत समितीवर पूर्ण बहुमतात युतीची सत्ता होती. नंतर चित्र बदलले.

Web Title: Guhagar Taluka President Selection Kokan Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..