Guhagar Tourism : पहिल्या समुद्रसफारीचा मान विद्यार्थ्यांना

पालशेतला साहसी खेळांचे उद्‌घाटन; पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न
Guhagar Tourism Students honor first sea voyage Inauguration of Adventure Games in Palshet
Guhagar Tourism Students honor first sea voyage Inauguration of Adventure Games in Palshetsakal

गुहागर : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्कीद्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २९) सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय पालशेतच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळतील.

त्यातून पालशेतमध्येही पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. अशी अपेक्षा लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू यांनी व्यक्त केली. सी स्टॉर्म व सी स्पिरिट या दोन नवीन जेट स्कीद्वारे सागरी साहसी खेळ सुविधा आजपासून पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू झाल्या आहेत.

सध्या सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जेट स्कीद्वारे समुद्रसफरीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. सागरी साहसी खेळांच्या पालशेत किनाऱ्यावरील सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २९) पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.

जितेंद्र जोशी यांनी सुरुवातीला सागरपूजन त्यानंतर दोन्ही जेटस्कींचे पूजन केले. त्यानंतर पालशेतचे उपसरपंच महेश वेल्हाळ, उद्योजक राजन दळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, गुहागर शहर व्यापारी संघटना अध्यक्ष नरेश पवार, पालशेतमधील हॉटेल व्यावसायिक पांडुरंग विलणकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.

या वेळी आंबा बागायतदार विलास ओक, नरवणचे डॉ. कैलास वैद्य व मधुरा वैद्य, सरपंच संपदा चव्हाण, पंकज बिर्जे, पद्मनाभ जोशी आदी उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर जेटस्कीवरून पहिली समुद्रसफर करण्याचा मान चौथीत प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेला अर्णव पाटील, तिसरीत प्रथम क्रमांक मिळवणारी शालवी तोडणकर आणि जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी पालशेतकर विद्यालयाची विद्यार्थिनी प्रगती जोशी यांना देण्यात आला.

या वेळी मनोगत व्यक्त करताना जितेंद्र जोशी म्हणाले, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विभागाच्या सर्व परवानग्या घेऊन ही सुविधा पालशेत समुद्रकिनारी आपण सुरू केली आहे. या कामासाठी मेरीटाईम बोर्डाचे क्षेत्रीय बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांचे मार्गदर्शन योगदान मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com