गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला रॅपलिंगचा थरार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

रत्नागिरी - र. ए. सोसायटीच्या रा. भा. प्रशालेच्या ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या ॲडव्हेंचर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाट्ये येथील झरीविनायक मंदिराच्या परिसरातील डोंगरावरून रॅपलिंगचा थरार विद्यार्थ्यांनी अनुभवला. रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, केव्हिंग, बोटिंग या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उंच डोंगराच्या कड्यावरून दोरीच्या साह्याने कसे उतरायचे, याचे प्रात्यक्षिक मुलांनी केले. यासाठी मुलांना रत्नागिरीतील मांउटेनिअर्स राजेश नेने व अथर्व नेने आणि सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर भगवती बंदराखाली असलेल्या गुहेमध्ये मुलांना नेण्यात आले होते. एखाद्या गुहेत कसे जावे, तेथे कशा प्रकारे काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन मुलांना करण्यात आले. केव्हिंगचा हा थरार गुरुकुलच्या मुलांना खूपच आनंददायी वाटला. त्यानंतर भाट्ये समुद्रकिनारा ते चिंचखरी असा खाडी प्रवास होडीतून केला. भाट्ये येथून प्रवासाला सुरवात केल्यानंतर मुले प्रथम जुवे येथील दत्त मंदिराजवळ थांबली. तेथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुलांनी परिसरातील चुनाभट्टीची माहिती घेतली. त्यानंतर मुलांनी होडीतून पुढचा प्रवास करत चिंचखरी येथील किनाऱ्यावर उतरून कांदळवनांचे महत्त्व जाणून घेतले. नंतर परतीचा प्रवास करत मुले पुन्हा भाट्यात आली.

कॅम्प यशस्वी करण्यासाठी गुरुकुलातील शिक्षक किरण सनगरे, देवराम दळवी, सुशांत पवार, गौरव पिळणकर, स्वप्नील कर्लेकर, पल्लवी शेट्ये यांनी मेहनत घेतली. गुरुकुल प्रमुख राजेश आयरे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Gurukul students threw an impression of Rapling