अबब... दापोलीत पकडला तब्बल 'इतक्या' लाखांचा गुटखा...

Gutkha seized in Dapoli
Gutkha seized in Dapoli

दापोली - दापोली शहराजवळील मौजे दापोली येथे एका गोदामावर रत्नागिरी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी छापा मारुन 9 लाख 97 हजारांचा गुटखा, पानमसाला आदी जप्त केला असून या गोदामाला  सील लावण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिली.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी  प्रशांत गुंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना मिळालेल्या माहितीनुसार काल (ता.26) रोजी दुपारी 2.30 वाजता त्यांनी  गणेश गोविंद खेडेकर, रा. खेड यांच्या  मौजे दापोली येथील गोदामावर छापा मारला असता गोदामात मोठया प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला.

जप्त साठा पुढील प्रमाणे...

यात सीस्का कंपनीचे 300 पॅकेटस किंमत रुपये 90 हजार, महेक सिल्वर पानमसाला 2 हजार पॅकेटस किंमत रुपये 5 लाख 20 हजार, एम 1 जर्दा 2 हजार पॅकेटस किंमत रुपये 44 हजार रुपये, बॉस पॅक पॅकेट 500 पॅकेटस किंमत रुपये 1 लाख रुपये, गोवा 1000 (पिंक) 49 पॅकेट किंमत रुपये 15 हजार 925, गोवा 1000 (ग्रीन) 28 पॅकेटस किंमत रुपये 9 हजार 800, राज कोल्हापुरी 6 पॅकेटस किंमत रुपये 1 हजार 350, एम-4 जाफरानी जर्दा 75 पॅकेटस किंमत रुपये 2 हजार 250, के पी गोल्ड 16 पॅकेटस किंमत रुपये 3 हजार 600, रजनीगंधा पानमसाला 24 पॅकेटस 22 हजार 32, टॅक्सी गोल्डन टोबॅको 300 टिन्स किंमत रुपये 18 हजार, रत्ना टोबॅको 400 टिन्स किंमत रुपये 92 हजार, आरएमडी गुटखा 21 पॅकेटस किंमत रुपये 21 हजार, मुसाफीर पान मसाला 75 पॅकेटस किंमत रुपये 15 हजार रुपये, वाणी टोबॅको 300 टिन्स किंमत रुपये 22 हजार 500 असा एकूण 9 लाख 97 हजार 457 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा  गणेश गोविंद खेडेकर यांनी विक्रीसाठी केला होता. हा साठा जप्त करण्यात आला असून गोदाम सील करण्यात आले असून गणेश गोविंद खेडेकर यांचे विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ यांनी दापोली पोलिस ठाण्यात भादवी कलम 188,272,273,328 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार तक्रार दाखल केली आहे.

 ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली  अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ, दशरथ कांबळे, सुहास पाटील यांनी केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com