वाट चुकलेल्या मतीमंद तरुणाला माहेर संस्थेने दिला आधार

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - मतिमंदत्वामुळे दौंड, पुणे येथून भरकटलेल्या घनश्याम विठ्ठल चौधरी याला हातखंबा येथील माहेर संस्थेने पुन्हा घर मिळवून दिले. संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे व अमित चव्हाण यांनी त्याची व नातेवाइकांची भेट घालून दिली.

रत्नागिरी - मतिमंदत्वामुळे दौंड, पुणे येथून भरकटलेल्या घनश्याम विठ्ठल चौधरी याला हातखंबा येथील माहेर संस्थेने पुन्हा घर मिळवून दिले. संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे व अमित चव्हाण यांनी त्याची व नातेवाइकांची भेट घालून दिली.

याबाबत कांबळे यांनी सांगितले की, 13 जुलैला निवळी फाटा येथील शेडमध्ये तरुण विचित्र अवस्थेत झोपल्याचा निनावी फोन संस्थेत आला. आम्ही त्याला माहेर संस्थेत आणले. त्याचे कपडे मळलेले होते व थंडी वाजून ताप आला होता. त्याला तत्काळ औषधपाणी दिले. नाव गणेश व गाव दौंड एवढेच तो सांगत होता. मतिमंदत्वामुळे त्याला पत्ता सांगता येत नव्हता.

तू शाळेत होतास का, असे विचारल्यावर त्याने मानेने होकार दिला. हा धागा पकडून कांबळे यांनी दौड पोलिस ठाण्याचा नंबर मिळवून ठाणे अमंलदार काळे यांना माहिती दिली. मात्र त्याची बेपत्ता नोंद दाखल नव्हती. त्यानंतर कांबळे यांनी समाजकल्याणच्या वसतिगृहातील अधीक्षकांनी दौडमध्ये नवीन कोर्टाजवळ मतिमंदाची शाळा असल्याचे सांगितले. जवळच असलेल्या सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांनी माणुसकी दाखवत शाळेजवळील स्वर्गीय सुभाष अण्णा मतिमंद व बहुविकलांग मुलांच्या शाळेत फोटो दाखवला. त्या वेळी प्रशिक्षक गिरीश शिपरगी यांनी तो या शाळेत 18 वर्षापर्यंत होता. मेपासून तो पालकांच्या ताब्यात असल्याचे सांगितले व त्याचे नाव घनश्याम विठ्ठल चौधरी (रा. पिंपळगाव, दौंड) असल्याचे सांगितले व वडिलांचा फोन नंबर दिला.

दरम्यानच्या काळात पोलिस काळे यांनी चौधरी यांना रत्नागिरीत जाऊन मुलगा ताब्यात घेण्याची सूचना दिली. त्या वेळी विठ्ठल चौधरी हे पंढरपूरला वारीला गेल्याचे सांगितले. नंतर ते निघाले पण महाराष्ट्र बंदमुळे रत्नागिरीत लवकर पोहोचू शकले नाहीत. वडील व मामा दत्तात्रय झिंनजूरके हे माहेर संस्थेत पोहोचले.

घनश्याम घरातून कधी निघून गेला हे कळलेच नाही. आम्ही त्याचा बराच शोध घेतला. माझा मुलगा माहेर संस्थेच्या निःस्वार्थी प्रयत्नांमुळे सुखरूप मिळाला. धन्यवाद देण्यासाठी शब्द कमी पडत आहेत.

- विठ्ठल चौधरी.

 

--

ओळी

.

Web Title: handicap youth got shelter from Maher institute