अलिबागचा हापूस वाशी मार्केटमध्ये

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अलिबागचा हापूस आंबा वाशी मार्केटमध्ये दाखल
Hapus of Alibag in Vashi market
Hapus of Alibag in Vashi marketsakal

अलिबाग : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अलिबागचा हापूस आंबा वाशी मार्केटमध्ये दाखल झाला. नारंगी येथील आंबा बागायतदार १५ वर्षांपासून जानेवारी महिन्यात आंबा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. २ डिसेंबरला पडलेल्या पावसाने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतरही हवामानात सतत होणाऱ्या बदलाच्या संकटातून एस. के. मँगोजचे मालक वरूण पाटील यांनी प्रत्येकी दोन डझनाच्या सहा पेट्या विक्रीसाठी पाठवल्या आहेत. प्रत्येक पेटीला २० हजारपर्यंत बोली लागेल, असा अंदाज आहे.

Hapus of Alibag in Vashi market
हरभजन-पत्रकाराचा टिवटिवाट; BCCI अधिकाऱ्याची निवडसमितीत लुडबूड?

वाशी कृषी उत्पन्न समितीच्या मंडईत गुरुवारी या सहा पेट्यांना लिलाव होणार आहे. डझनाला साधारण पाच ते दहा हजाराची बोली लागण्याची पाटील यांना आशा आहे. ५० एकर आंबा बागेला ऐयू/०५८९१/जीआय/१३९/२२८ हा जीआय क्रमांक प्राप्त आहे. ऑक्टोबर महिन्यातच त्यांच्या झाडांना मोहर लागला. त्यानंतर तीन वेळा पडलेल्या अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सातत्याने केलेली फवारणी आणि अनुभवाच्या जोरावर यावर मात करण्यात त्यांना यश आले. यातूनच तयार झालेला हापूस आंबा बाजारात पाठविण्याचा मुहूर्त प्रजासत्ताक दिनी साधण्यात आला. सध्याच्या थंडीमुळे आंब्याला मोहर लागण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत मोहर लागून गेल्यानंतर साधारण एप्रिलच्या अखेरीस काही प्रमाणात आंबा बाजारात दाखल होईल. त्यानंतर मे महिन्यापर्यंत आंबा बाजारात मोठ्याप्रमाणात दाखल होईल, असा अंदाज पाटील यांचा आहे.

Hapus of Alibag in Vashi market
उत्तर प्रदेशची निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल : अमित शहा

अलिबाग तालुक्यातील आंबा बागायतदार आधुनिक पद्धतीने आंब्याचा विक्रमी पीक घेत आहेत. नारंगी येथील वरुण पाटील, डॉ. संदेश पाटील. डॉ. अर्चना पाटील हे प्रयोगशील शेतकरी मागील १५ वर्षांपासून अलिबागचा आंबा जानेवारी महिन्यातच वाशी बाजारात दाखल करीत आलेले आहेत.

''अलिबागचा हापूस आंबा पातळ साळ आणि विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये या आंब्याला चांगली मागणी आहे. दहा दिवसांनी आंब्याची दुसरी खेप तयार होईल. माझ्या आई-वडिलांना, काकांना या क्षेत्रात खूप चांगला अनुभव आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून यावर्षी आलेल्या संकटातून मार्ग काढण्यात यश आलेला आहे. आमच्या बागेतून दरवर्षी साधारण २० ते २५ हजारच्या पेट्या बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. येथील जीआय मानांकित आंबा थेट परदेशात पाठविण्याचेही प्रयत्न यावर्षी असणार आहेत.''

- वरुण पाटील, जीआय मानांकित आंबा उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com