थंडीबरोबरच उष्म्याचाही आघात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

सावंतवाडी - पहाटेच्या थंडीबरोबरच धुक्‍याची तीव्रता गेल्या दोन दिवसापूर्वीपासून वाढली आहे. सकाळी साडेदहानंतर मात्र जिल्हावासीयांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. थंडीपासून बचाव करणाऱ्या पोशाखांच्या खरेदीच्या लगबगीला सुरवात झाली आहे तर दुपारच्या कडक उन्हापासून शरीराला आराम देण्यासाठी दिवसा थंडपेयाच्या दुकानात गर्दी होत आहे. असे हे थंडी आणि उन्हाच्या खेळाचे चित्र जिल्हाभर दिसत आहे.

थंडीत पहाटे पडणारे धुके नागरिकांचे मन मोहून घेत आहे. सकाळच्या वेळी आपल्या विविध कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिकही थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी, हातमोजे यांना सोबत घेऊन जात आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वीच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. आता त्यासाठी आता शहरी भागातील बाजारपेठाही सजत आहेत. विविध आकर्षक थंडीपासून बचाव करणाऱ्या पोषाखांची निवड करण्यासाठी दुकानात खरेदीसाठीची लगबग सुरू होत आहे. सायंकाळची वेळ सुरू होताच साडेसहाच्या दरम्यानच्या वेळात थंडीची चाहुल लागण्यास सुरू होते. पचनक्षमतेला पूरक असलेला हा थंडीचा महिना सर्दी-पडसे, खोकल्याला आमंत्रण देणारा असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने बरेचजण आपली काळजी घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. फुलोरा चांगला डौलदार येण्यासाठी अशाच प्रकारचे वातावरण राहणे आवश्‍यक आहे. दुपारच्यावेळी मात्र कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लगत आहे. भर दुपारच्या शरीराची लाही करणाऱ्या उन्हाचे स्वरूप पाहता ग्रामीण शहरी भागात थंडपेयाच्या दुकानांकडे नागरिकांची पाऊले वळत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या भागात ऊस रसाच्या विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. पर्यटकांचा त्यांच्या व्यवसायाला मोठा प्रतिसादही लाभत आहे.

Web Title: Heat in winter in Sawantwadi