मुंबई गोवा महामार्गावर भर उन्हाळ्यात दाट धुक्याची दुलई

अमित गवळे 
गुरुवार, 29 मार्च 2018

पाली - जिल्ह्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढत आहे. मात्र गुरुवारी (ता. 29) मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड ते कोलाड पर्यंत सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यन्त दाट धुक्याची दुलई पसरली होती.

पाली - जिल्ह्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढत आहे. मात्र गुरुवारी (ता. 29) मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड ते कोलाड पर्यंत सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यन्त दाट धुक्याची दुलई पसरली होती.

दाट धुक्यामुळे 50-80 फूटापर्यंत काही दिसत नव्हते. यामुळे या मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड ते कोलाड पर्यंतच हे धुके होते. त्यामुळे अचानकपणे समोर पडलेल्या या दाट धुक्याने वाहनचालक व प्रवासी अचंबित झाले होते. भर उन्हाळ्यात निसर्गाचा हा चमत्कार सर्वांना अनुभवायला मिळाला. या परिसरात काहीकाळ गारवा जाणवत होता. अचानक समोर आलेले दाट धुके पाहून आश्चर्य वाटले. येथील वातावरण प्रसन्न झाले होते. मात्र असे होण्याचे कारण शोधणे आवश्यक असल्याचे सुहास पाटील या प्रवाश्याने सकाळला सांगितले.

Web Title: heavy fog on mumbai goa highway