

Gauri Festival Weather Update Heavy Rain Brings Relief to Farmers Light Showers Likely Across Maharashtra Till September 20
sakal
रत्नागिरी: पाण्याअभावी भातशेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. १६) दुपारनंतर मुसळधार पाऊस पडल्याने बळीराजाला दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० सप्टेंबरपर्यंत तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जनावेळी पाऊस राहील, अशी शक्यता आहे.