Ballaleshwar Temple: मुसळधार पावसाचा फटका! पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात शिरले पुराचे पाणी; सभामंडप जलमय..

Floodwater enters Ballaleshwar Temple in Pali: ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंदिर परिसर जलमय; भाविक, कर्मचाऱ्यांची धावपळ, सभामंडपात साचलेल्या पाण्यामुळे धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम
Historic Ballaleshwar Temple in Pali Waterlogged Amid Torrential Rainfall

Historic Ballaleshwar Temple in Pali Waterlogged Amid Torrential Rainfall

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: मुसळधार पावसामुळे पाली येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर मंदिरात रविवारी (ता. 5) रात्री मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. मंदिरासमोरील पूर्व भागात असलेल्या ओढ्याला (ओव्हळ) पूर आल्याने हे पाणी ओसंडून थेट मंदिरात आणि आजूबाजूच्या परिसरात शिरले. या घटनेमुळे मंदिराचा सभामंडप जलमय झाला असून भाविक आणि कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com