esakal | नदी-नाले तुडुंब, वाहतूक ठप्प, शेतकरी चिंताग्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain impact vengurla konkan sindhudurg

मानसीश्‍वर देवस्थान, एसटी स्टॅण्ड आणि कॅम्प परिसरही पाण्याने वेढून गेला होता. 

नदी-नाले तुडुंब, वाहतूक ठप्प, शेतकरी चिंताग्रस्त

sakal_logo
By
दिपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यात शनिवार (ता.11) रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्‍यातील सर्वच नदी, नाले, ओहोळ यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणच्या ओहोळांचे पाणी आजूबाजूच्या शेती, बागायतीमध्ये घुसल्याने मोठे नुकसानही झाले. 

गेले काही दिवस तालुक्‍यामध्ये अधूनमधून पाऊस सुरू होता. शनिवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्‍यात सर्वत्र ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली. दरम्यान, शहरातील साकव, आडीपूल, पत्र्याचे पूल, देऊळवाडा येथील ओहोळांमधील पाणी आजूबाजूच्या शेती आणि बागायतींमध्ये घुसल्याने तिथला परिसर जलमय झाला.

रस्त्यावर आलेल्या पाण्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. येथील नगर वाचनालयानजीक असलेल्या साकवाचे पाणी येथील रहिवासी दिगंबर रेडकर यांच्या घरामध्ये व गिरणीमध्ये घुसले. रुपेश गोलतकर, बाळा रेडकर, सिद्धेश रेडकर, अनिल कासकर, साईराज कासकर, वासुदेव कासकर, सुनंदा गावडे व प्रथमेश गुरव यांच्या घरासमोर पाणी साचल्याने नुकसान झाले.

येथील काही दुकानांमध्येही किरकोळ स्वरूपात पाणी घुसण्याचे प्रकार घडले. साकव पुलानजीक असलेला काही कॉम्प्लेक्‍स आवारही जलमय झाला होता. मानसीश्‍वर देवस्थान, एसटी स्टॅण्ड आणि कॅम्प परिसरही पाण्याने वेढून गेला होता. 

पूरस्थितीवर एक नजर 
- अणसूर-धरमगावडेवाडीत शेतकऱ्यांचे नुकसान 
- केळूस-हरिजनवाडी वस्तीत पाणी, स्थलांतर 
- होडावडा व तळवडेला जोडणाऱ्या पुलावर पाणी 
- तुळस-पलतड नदीवरील पुलाच्या बाजूने पाण्याचा वेढा 
- मातोंड, तुळस पलतडमार्गे वेंगुर्लेला जाणारा मार्ग ठप्प 
- मातोंड व होडावडा वाहतूक ठप्प 
- तुळस-मातोंड पंचक्रोशीतील गावांचा तुटला संपर्क 

पाऊस असा.... 
दरम्यान, दुपारनंतर पाऊस जरी कमी झाला असला तरी पुलांवरील पाणी हे सायंकाळपर्यंत तसेच होते. तालुक्‍यात शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 या दरम्यान 141 मि.मी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्‍यात 170 मि.मी. पाऊस झाला आहे.

संपादन ः राहुल पाटील

loading image