खेडमध्ये नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

खेड- तालुक्‍यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून, काल (गुरुवार) सायंकाळी तालुक्‍यातील नारंगी व जगबुडी या दोन्ही नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली. त्यामुळे खेड शहराला पालिकेच्या वतीने सायंकाळच्या सुमारास धोक्‍याचा इशारा देण्यात आला. 

व्यापारी वर्गाने देखील काही प्रमाणात मालाची आवराआवर करण्यास सुरवात केली होती. परंतु रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यामुळे खेड बाजारपेठ सुमारे आठ तास पाण्याखाली गेली होती. त्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

महामार्गावरील जगबुडी नदीवर असलेला ब्रिटीशकालीन पुलदेखील रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबविण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग तब्बल बारा तास बंद ठेवण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास पावसाने उसंत दिल्याने पुराचे पाणी कमी झाले. त्यामुळे सकाळी साडे आठ वाजता या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Heavy rain in Khed