esakal | Kokan Rain Update - शास्त्री, सोनवी, गडनदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan Rain Update - शास्त्री, सोनवी, गडनदीला पूर

Kokan Rain Update - शास्त्री, सोनवी, गडनदीला पूर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

संगमेश्वर : तालुक्यात रविवारी (११) रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) आज (१२) रोजी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शास्त्री, सोनवी, गडनदीचे पाणी पात्राबाहेर (river flood) गेल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संगमेश्वर (sangmeshwar) आठवडा बाजारात पुराचे पाणी आले असून कसबा आणि कोंडिवरे परिसरात पुराचे पाणी आहे. माखजन बाजारपेठत पुराचे पाणी घुसले आहे.

गेल्या १२ तासांत संगमेश्वर तालुक्यात पावसाने १०० मि.मी.पेक्षा जास्त सरासरी नोंदवली आहे. हवामान खात्याने दोन दिवस आधीच रत्नागिरी जिल्ह्यात सलग तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा दिला होता. तो खरा ठरत आहे. रविवारी दिवसभर सरीवर असलेल्या पावसाने रात्री उशिरा जोरदार बॅटिंग सुरू केली. रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज दिवसभर कोसळतच आहे. यामुळे शास्त्री, सोनवी, (sonavi) गड, असावी, अलकनंदा नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. शास्त्रीनदीने पात्र सोडल्याने पुराचे पाणी आठवडा बाजारात घुसले.

हेही वाचा: Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर; अनेक गावांचा तुटला संपर्क

गडनदीला आलेल्या पुराच्या पाण्याने कोंडिवरे - नायशी रस्ता पाण्याखाली गेला आहे. कसबा परिसरात मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या भागातील वाहतूक विस्कळित झाली आहे. माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी आल्याने येथील व्यापारी सतर्क झाले आहेत. फुणगुस खाडीतही पाणी पातळी वाढल्याने येथील व्यापारी सतर्क झाले आहेत. तालुका प्रशासन पुरस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

एक नजर..

  • १२ तासांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाउस

  • रात्रीपासून पाऊस सुरु; आज दिवसभरही

  • शास्त्री, सोनवी, गड, असावी, अलकनंदा नद्या दुथड्या

  • शास्त्रीनदीने पात्र सोडले; पुराचे पाणी बाजारात

  • कोंडिवरे - नायशी रस्ता गेला पाण्याखाली

  • फुणगूस खाडीतही पाणी पातळी वाढली

हेही वाचा: 50 वर्षापूर्वीच्या भाताच्या 9 देशी वाणांचे संकलन; कोकणी शेतकऱ्याचा प्रयोग

loading image