रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

दिवसभरात सरासरी 94.20 मि.मी. पावसाची नोंद,
चिपळूण - चिपळूण तालुक्‍याला शनिवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले.
चिपळूण - चिपळूण तालुक्‍याला शनिवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले.sakal
Updated on: 

पाली - रायगड जिल्ह्यात सोमवारी (ता. 11) ते मंगळवारी (ता. 12) 24 तासात सरासरी 94.20 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 192.00 मि.मी. पाऊस सुधागड तालुक्यात पडला.

जिल्ह्यात 01 जून पासून मंगळवारी (ता. 12) पर्यंत एकूण सरासरी 1 हजार 275.49 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात मागील वर्षी 12 जुलै रोजी सरासरी 18.26 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच 01 जून पासून 11 जुलै 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 1 हजार 097.76 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयातून मंगळवारी (ता.12) प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार

तालुकानिहाय पावसाची नोंद
अलिबाग - 51.00 मि.मी., पेण - 120.00 मि.मी., मुरुड- 46.00 मि.मी., पनवेल - 88.80 मि.मी., उरण - 06.00 मि.मी., कर्जत - 150.40 मि.मी., खालापूर - 130.00 मि.मी., माणगाव - 76.00 मि.मी., रोहा - 149.00 मि.मी., सुधागड - 192.00 मि.मी., तळा - 91.00 मि.मी., महाड- 110.00 मि.मी., पोलादपूर- 94.00 मि.मी, म्हसळा- 43.00 मि.मी., श्रीवर्धन- 14.00 मि.मी., माथेरान- 146.00 मि.मी.

मंगळवारी (ता.12) जिल्ह्याचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 507.20 मि.मी. इतके होते. त्याची सरासरी 94.20 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 41.13 टक्के इतकी आहे.--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com