सावंतवाडीत मुसळधार; वातावरणातील बदलाने बागायतदार अस्वस्थ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

सावंतवाडी- येथे अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. ऐन थंडीच्या हंगामात झालेला हा वातावरणातील बदल बागायतदारांची झोप उडविणारा ठरणार आहे.

सावंतवाडी- येथे अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. ऐन थंडीच्या हंगामात झालेला हा वातावरणातील बदल बागायतदारांची झोप उडविणारा ठरणार आहे.

शहरासह तालुक्‍यातील काही भागांत आज सातच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल झाला. जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. यानंतर काही वेळातच पावसालाही सुरवात झाली. 15 ते 20 मिनिटे जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. सध्या थंडीचा हंगाम आहे. विशेषतः आंब्याला मोहोर येण्यासाठी गुलाबी थंडीची गरज असते. तसे पोषक वातावरण असल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र अचानक झालेल्या या बदलाने बागायतदारांची डोकेदुखी वाढली आहे. किनारपट्टी भागात पावसाचा मागमूस नव्हता. मात्र वातावरणातील हे बदल कायम राहिल्यास त्याचे दुष्परिणाम आंब्यासह इतर पिकांवरही दिसण्याची भीती व्यक्त होत आहे.
 

Web Title: heavy rains in sawantwadi