Konkan Rain : कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले; आंबा-काजूवर गडद संकट, देवगड हापूस हंगामावरही परिणाम

जिल्ह्याला विजांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाने (Sindhudurg Unseasonal Rain) झोडपून काढले.
Sindhudurg Unseasonal Rain
Sindhudurg Unseasonal Rainesakal
Summary

संपूर्ण देवगड तालुक्याला पावसाने झोडपून काढले. त्याचा मोठा परिणाम देवगड हापूस हंगामावर होणार आहे.

वैभववाडी : जिल्ह्याला विजांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाने (Sindhudurg Unseasonal Rain) झोडपून काढले. सोमवारी (ता. ८) रात्रभर बरसल्यानंतर कालदेखील जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे आंबा, काजूवरील संकट अधिक गडद झाले असून, बागायतदारांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पडेल मंडलात ५०.३ मिलीमीटर इतकी झाली. संपूर्ण देवगड तालुक्याला पावसाने झोडपून काढले. त्याचा मोठा परिणाम देवगड हापूस हंगामावर होणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज दिल्यामुळे बागायतदारांची चिंता अधिकच वाढणार आहे.

Sindhudurg Unseasonal Rain
महायुतीचा धर्म पाळून आगामी निवडणुकीत विरोधकांचं डिपॉझिट जप्त करू; मुख्यमंत्र्यांनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग

जिल्ह्यात तीन-चार दिवस ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने ६ आणि ७ जानेवारीला हलक्या पावसाचा अंदाजदेखील दिला होता. रविवारी (ता. ७) जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा छिडकावा झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती होती. सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाळी वातावरण निर्माण झाले. वैभववाडी, फोंडा परिसरात पावसाळी वातावरणच होते.

वैभववाडी तालुक्यात साडेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरी कोसळल्या. सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री उशिरा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सर्वच तालुक्यात अवकाळीच्या सरीवर सरी सुरू होत्या. देवगड तालुक्याला अवकाळीने चांगलेच झोडपून काढले.

Sindhudurg Unseasonal Rain
Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 'वंचित'कडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी पाटलांना दिलं 'हे' आश्वासन

या तालुक्यातील पडेल, शिरगाव, देवगड, पाटगाव, बापार्डे मंडलांमध्ये तसेच मालवण तालुक्यातील श्रावण, पोईप तर कणकवली तालुक्यातील कणकवली, नांदगाव, वागदे मंडलात आणि वैभववाडी तालुक्यातील एडगाव आणि वैभववाडी तसेच कुडाळ तालुक्यातील कडावलमध्ये देखील जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस पडेल मंडलात ५०.३ मिलीमीटर तर शिरगाव मंडलात ४३.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. काल पहाटेपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. काही भागात सरी पडत होत्या. याचा मोठा फटका देवगड हापूसला बसणार आहे.

आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज

जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत असताना हवामान विभागाने १० आणि ११ जानेवारीला पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे बागायतदारांची चिंता आणखीनच वाढली आहे.

Sindhudurg Unseasonal Rain
संगीत अवकाशातील मुख्य तारा निखळला! उस्ताद राशीद खान यांच्या निधनानंतर हार्मोनियम वादकानं जागवल्या आठवणी

असा बरसला... तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

  • देवगड ३२.६

  • मालवण १२.४

  • सावंतवाडी ७.२

  • वेंगुर्ला ४.९

  • कणकवली १३.६

  • कुडाळ १६

  • वैभववाडी १८

  • दोडामार्ग ८.७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com