निराधार वृद्ध महिलेला 'त्यांनी' दिला वृद्धाश्रमाचा आधार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

उषा या गेली अनेक वर्षे वैश्यवाडा भागातील एका घरात भाडोत्री म्हणून राहत होत्या; मात्र, त्यांच्यामागे पुढे कोणी नाही आणि त्यातच त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे हा निर्णय संबंधितांना घ्यावा लागला. शहरातील वैश्यवाडा भागात श्रीमती तेली या राहत होत्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या.

सावंतवाडी : येथील वैश्यवाडा भागात निराधार अवस्थेत जीवन जगणार्‍या वृध्देला तेथील नागरिकांनी पुढाकार घेऊन संविताश्रमाच्या वृध्दाश्रमात आधार दिला. तिच्या पुढील खर्चासाठी काही आर्थिक मदतही केली. उषा जयराम तेली (वय 70) असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. 

उषा या गेली अनेक वर्षे वैश्यवाडा भागातील एका घरात भाडोत्री म्हणून राहत होत्या; मात्र, त्यांच्यामागे पुढे कोणी नाही आणि त्यातच त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे हा निर्णय संबंधितांना घ्यावा लागला. शहरातील वैश्यवाडा भागात श्रीमती तेली या राहत होत्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. या काळात त्यांच्या शेजारी राहणार्‍या अलका शिरसाट यांनी त्यांना सहकार्य केले. जेवण खाणे घातले; मात्र, गेले काही दिवस त्या आजारी पडून अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यामुळे त्यांची काळजी घेणे शिरसाट यांना शक्य झाले नाही. त्यांनी शहरातील काही समाजसेवकांच्या मदतीने तेली यांना वृध्दाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. 

त्यानुसार काल (ता.16) त्यांना संविताश्रमाच्या पदाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आले. यावेळी तेथील युवा कार्यकर्ते कुणाल सावंत यांच्यासह माजी नगरसेवक राजू मसूरकर, हेलन निब्रे यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला. यावेळी आश्रमाचे कर्मचारी उदय कामत, लीना पालकर उपस्थित होते.

पिग्मी जमविणार्‍या शिरसाटांचा प्रेमळपणा 

गेली अनेक वर्षे वृध्दापकाळाने थकलेल्या तेली यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या शेजारी राहणार्‍या अलका शिरसाट या महिलेने पुढाकार घेतला. त्या शहरात पिग्नी जमा करतात. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्याबरोबर तेली यांची सुध्दा देखभाल करीत होत्या; मात्र, गेले काही दिवस तेली अंथरुणाला खिळल्यामुळे रोजच्या कामात शिरसाट यांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी अखेर तेली यांना वृध्दाश्रमात पाठविण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Helpless Aged Women got Help from Old Age Home