'रेव्ह पार्टी'तील युवतींवर आली चेहरा झाकण्याची वेळ

high profile sex and drug racket exposed by raigad police
high profile sex and drug racket exposed by raigad police

रायगड : रायगडमध्ये सुरु असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पोलिसांनी शुक्रवारी (ता. 28) पर्दाफाश केला. यावेळी बंगल्यातून काही महिला आणि पुरूषांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत बॉलिवूडमधील अभिनेत्रींसह टीव्ही अभिनेत्रींचा समावेश होता. युवतींची रवानगी कर्जतच्या सुधारगृहात करण्यात आली असून, त्यांना आपला चेहरा झाकण्याची वेळ आली.

रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील अलिशान बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. या छापेमारीच्या कारवाईत चरस, कोकेन, विदेशी मद्य यासारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच या बंगल्यातून काही महिला आणि पुरूषांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत बॉलिवूडमधील अभिनेत्रींसह टीव्ही अभिनेत्रींचा समावेश होता. सर्व आरोपींसह सात युवतींना अलिबाग न्यायालयासमोर आज (शनिवार) हजर केल्यानंतर त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांच्यार मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जमील शेख, सहायक पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे, पोलिस उपनिरीक्षक बुरुंगळे व 25 पोलिस कर्मचारी यांनी पार पाडली. दरम्यान, ज्या अलिशान बंगल्यावर छापा टाकण्यात आला तो बंगला प्रसिद्ध उद्योगपतीचा असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com