1 जूनच्या वाढदिवसाचे गमक...

अमित गवळे
शनिवार, 2 जून 2018

पाली (रायगड) : बहुतांश जणांचे नातेवाईक किंवा जवळपासच्या व ओळखतील लोकांचा 1 जूनला हमखास वाढदिवस असतो. इतक्या साऱ्या जणांचा वाढदिवस एकाच दिवशी येण्याचे मोठे गमक आहे.

फेसबुकवर नजर फिरविल्यास अनेकांच्या फ्रेंडलिस्ट मधील 50 ते 100 जणांचा वाढदिवस 1 जूनला असल्याचे नोटोफिकेशन पहायला मिळतात. त्यामुळे एकाच वेळी इतक्या साऱ्या जणांना शुभेच्छा देतांना त्यांची शुद्ध दमछाक होत होती.

हा काही योगायोग नसून 1 जून जन्मतारीख येण्यामागे महत्वाची 3 करणे आहेत. एक म्हणजे खेडेगावात किंवा अशिक्षित कुटुंबात जन्म झाला असल्यास मुलाच्या पालकांना जन्मतारीख लक्षात राहत नाही. त्याच बरोबर 5 ते 10 वर्षांपूर्वी जन्म नोंदणी फारसी होत नसे किंवा वेळेत केली जात नसे त्यामुळे जन्मदिनांक नोंदवितांना अडचण यायची. आणि सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे पाच-सहा वर्षे पूर्ण झाल्यावर मुलांना जून महिन्यात शाळेत टाकण्यासाठी जन्मतारीख लावणे गरजेचे. त्यावेळेस 7 जूनला शाळा सुरू होत असत. मग अशावेळी मुलाला शाळेत प्रवेश मिळावा आणि त्याला शिकता यावे या उद्देशाने मग शाळेचे गुरुजी पाच - सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलाची जन्मतारीख 1 जून लावून त्यांना शाळेत दाखल करून घेत.  आणि या अशा गंमतीशीर मात्र महत्वाच्या कारणांमुळे अनेकांची जन्मतारीख 1 जून आहे.

आई वडील ग्रामीण भागातील व अशिक्षित असल्याने त्यांना जन्मतारीख माहीत नव्हती मग शाळेत दाखल करण्यासाठी 1 जून जन्मातारीख टाकली. मी स्वतः शिक्षक असल्याने खेड्यापाड्यातील व आदिवासी समाजातील अनेक मुले शाळेत दाखल करण्यासाठी आल्यावर त्यांच्या पालकांना आपल्या पाल्याची जन्मतारीख माहीत नसते किंवा आठवत नाही. मग अशावेळी ज्या मुलांचे शाळेत दाखल करून घेण्याचे वय पूर्ण झाले आहे त्या मुलांच्या जन्मतारीख मी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी अशा राष्ट्रीय सणाच्या तारखा टाकतो/मांडतो. 
- मोहन भोईर, प्राथमिक शिक्षक

Web Title: history behind 1 june birth date