गांडूळ खत विक्रीतून मिळाला घरखर्चाला हातभार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - गांडूळ खत निर्मितीमधून घरखर्चाला हातभार लावता येतो, हे गोळपच्या (ता. रत्नागिरी) दीप्ती शिंदे या गृहिणीने दाखवून दिले आहे.

पंधरा दिवसांत चार हजार रुपये उत्पन्न त्यांनी मिळविले. घरची यथातथाच परिस्थिती असल्याने सौ. शिंदे यांना व्यवसायाचा नवीन फंडा उपयुक्‍त ठरत आहे. यासाठी रिलायन्स फाउंडेशनसह रत्नागिरीच्या लोकसंचालित सेवा केंद्र आणि भाट्ये नारळ संशोधन केंद्राने सहकार्य केले.

सौ. शिंदे यांचे पती सोनाराच्या दुकानात काम करतात. सौ. शिंदे यांना दोन मुले, पती, सासू-सासरे, दीर असा ७ जणांचा परिवार. घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागावा म्हणून दीप्ती यांनी मोलमजुरी करण्यास सुरवात केली. त्या लोकसंचलित सेवा केंद्र, रत्नागिरी यांच्या संपर्कात आल्या. त्यामुळे त्यांना बचत गटाचे महत्त्व समजले. त्या बचत गटाच्या सभासद झाल्या. तसेच माविमच्या विविध प्रशिक्षणात सहभागी होऊन पापड, कोकम सरबत बनविण्यास सुरवात केली. त्यातून घरात हातभार लावायला सुरवात केली. या दरम्यान लोकसंचलित सेवा केंद्र, नारळ संशोधन केंद्रस, भाटे व रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्यातर्फे नैसर्गिक साधन संपत्तीपासून गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.

गोळप येथे गांडूळ खतनिर्मितीचे प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर सौ. शिंदे यांनी माती व पालापाचोळा वापर करून गांडूळखत निर्मितीस सुरवात केली. सर्वप्रथम प्लास्टिक बेड विकत घेतला आणि नारळ संशोधन केंद्रातून देण्यात आलेले गांडूळखत निर्मितीसाठी वापरण्यास सुरवात केली. दोन महिन्यांच्या देखभालीनंतर सुमारे ४०० किलो गांडूळखत उपलब्ध झाले. एक किलो गांडूळखत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून १० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकण्यास सुरवात केली. यातून त्यांना सुमारे चार हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यात ८०० रुपये प्लास्टिक बेडचा नाममात्र खर्च आला. आता त्यांनी गांडूळ खताचे दोन बेड तयार करण्यास सुरवात केली. नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून आर्थिक उत्पन्न मिळवता येते, हे सौ. शिंदे यांनी गांडूळखत निर्मितीतून दाखवून दिले आहे. 

Web Title: home expenditure contribution received from the sale of fertilizer annulose