मुंबईहून होम क्वारंटाईन दाम्पत्य आले रत्नागिरीत अन्......उडली चांगलीच धांदल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

मुंबईत होम क्वारंटाईन  करून ठेवलेले दाम्पत्य पळून रत्नागिरीतील आल्याने आरोग्य योजनेची धावपळ उडाली आहे. 

रत्नागिरी : कोरोना व्हायरसबाबत जिल्ह्यात दिलासा देणारी बाब पुढे आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आता अवघे 6 संशयित उरले. ही संख्या यापूर्वी 17 पर्यंत गेली होती. 52 संशयितांना आतापर्यंत डिस्चार्ज दिला आहे. मात्र दुसरी संतापाची गोष्ट म्हणजे मुंबईत होम क्वारंटाईन करून ठेवलेले दाम्पत्य पळून रत्नागिरीतील आल्याने आरोग्य योजनेची धावपळ उडाली आहे.

पोलिसांच्या मदतीने त्या दाम्पत्याला रुग्णालयात विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले.कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने आजपासून 21 दिवस लॉकडाउन केले आहे. दिवसेंदिवस संशयितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शासनाने संचारबंदी अधिक कडक केली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोना संशयितांचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी रत्नागिरी जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सतरा संशयितांवर उपचार सुरू होते.मात्र त्यांची प्रकृती सुधारल्याने उर्वरित रुग्णांना घरी सोडून त्यांना होम क्वारंन्टाईन करून ठेवले आहे. फक्त सहा संशयितांवर जिल्हा रुग्णालयत उपचार सुरू आहे.

हेही वाचा- कामाच पैसे मिळाल्यावर धान्य आणू ; आता गर्दीत गर्दी नको.. अस ती म्हणाली अन्

मुंबईतून आले पळून, जिल्हा रुग्णालयात दाखल

जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल झालेल्या आतापर्यंतच्या 52 रुग्णांना डिस्चार्च दिला आहे. मात्र त्यांना घरी क्वारंन्टाईन करून ठेवले आहे. जिल्ह्यातील सर्व विलगीकरण केंद्रामध्ये एकूण सुमारे 500 जण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कोरोना संशयितांची जिल्ह्यातील घटती संख्या जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि जनतेला दिलासा देणारी आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा जिवाचे रान करीत आहे. मात्र मुंबईतील एका दाम्पत्याला होम क्वारंटाइन केले. असताना ते पळून रत्नागिरीत आले.

हेही वाचा-मंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली कोरोना मुक्तीची गुढी : खबरदारी घेण्याचे  आवाहन

सहा संशयित रुग्णालयात

महत्त्वाच्या कामाच्या नावाखाली त्यांनी कायद्याचा भंग केला आहे. त्यात संसर्गाचा फैलाव वाढण्याच्या भितीने यंत्रणेला धडकी भरली. मात्र याची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी त्या दाम्पत्याला ताब्यात घेण्याबाबत पोलिसांना सूचना केल्या. पोलिस त्यांना परत मुंबईला रवाना करणार होते. परंतु त्यामुळे संसर्ग वाढू शकते, म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केले आहे.

52 संशयित होम क्वारंटाईन
जिल्हा शासकीय रुग्णालयात अवघे सहा कोरोना संशयित रुग्ण आहे. जिल्ह्याच्यादृष्टीने ही चांगलीबाब आहे की संशयित वाढत नाहीत. आतापर्यंत 52 संशयितांना डिस्चार्च दिला असून ते होम क्वारंटाईन म्हणून घरी पाठवले आहे. 
डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा शल्यचिकित्सक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Quarantine Couple come in ratnagiri kokan marathi news