

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात झाला आहे.
esakal
Horrific Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावाजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने तीन चारचाकी वाहनांना आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मोटारमधून प्रवास करणारे दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. खेड तालुक्यातील वेरळ येथे गेली अनेक वर्षे महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे.