Hospital loan Fraud in Kolhapur : सेवानिवृत्त शिक्षकाची पावणेसहा कोटींची फसवणूक, 'हॉस्पिटल उभारणी'चे लाटले कर्ज; ठार मारण्याचीही दिली धमकी, तिघांना अटक

Hospital loan fraud case in Kolhapur : हातकणंगलेतील रुग्णालय आधुनिकीकरणासाठी मंजूर कर्जातून सुमारे ५.७५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.
What is the Kolhapur hospital loan fraud?

What is the Kolhapur hospital loan fraud?

esakal

Updated on

हातकणंगले (कोल्हापूर) : रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या वीस कोटी रुपयांपैकी साडेसात कोटींचे कर्ज मंजूर करून, त्यातील काही रक्कम परस्पर हडप करून पावणेसहा कोटींची (Handkanangale hospital financial scam) फसवणूक केली. याबाबत विचारणा केली असता, जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार हेर्ले (ता. हातकणंगले) येथील सेवानिवृत्त शिक्षक आण्णासाहेब बापूसाहेब चौगुले (वय ८१) यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com