
Fire brigade controlling the blaze at Dharagal Ayush Hospital’s washing machine unit, which caused damage worth ₹15 lakh.
Sakal
बांदा: धारगळ-गोवा येथील केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या आयुष हॉस्पिटलमध्ये शनिवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. हॉस्पिटलच्या वॉशिंग मशीन युनिटमध्ये लागलेल्या या आगीत चार वॉशिंग मशीनसह इतर उपकरणे, कपडे व साहित्य जळून खाक झाले. एकूण अंदाजे १५ लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.