esakal | रत्नागिरीत कोरोनाबळींचे शतक पार
sakal

बोलून बातमी शोधा

the hundred corona patients died in ratnagiri

जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2747 इतकी झाली. 

रत्नागिरीत कोरोनाबळींचे शतक पार

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : शनिवारी 7 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 101 वर पोचला आहे. 
गेल्या 24 तासात जिल्ह्यात ॲन्टीजेन चाचणीत 41 तर आरटीपीसीआर चाचणीत 25 असे एकूण 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2747 इतकी झाली. 

हेही वाचा - चिपळूणातील हा पुल वाहतूकीसाठी बंद..

नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी 25 तर ॲन्टीजेन  टेस्ट मधील रत्नागिरी 18, राजापूर 1, लांजा 5, संगमेश्वर 8, घरडा रुग्णालय 9 येथील रुग्णांचा समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. चिपळूण तालुक्यातील खिंडी येथील 65 वर्षीय रुग्णाचा तसेच डोकलवाडी येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा उपचार दरम्‍यान मृत्यु झाला. 

हेही वाचा -  रत्नागिरीत नौका उलटून एका खलाशाचा मृत्यू, एक बेपत्ता..

खेड तालुक्यातील भोस्ते येथील 65  वर्षीय महिला रुग्ण, खेड येथील 55 वर्षीय रुग्ण आणि लोटे येथील 70 वर्षीय कोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. दाभोळ, दापोली येथील 73 वर्षीय कोरोना रुग्णाचा आणि गवळीवाडा, रत्नागिरी येथील 72 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 101 झाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image