टेम्पोतील दहा लाखांचा मुद्देमाल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

युवकास अटक... 
बांदा-दाणोली मार्गावरच अन्य एका कारवाईत श्रीरंग प्रमोद सावंत (वय. 33, रा. कोलगाव-निरूखेवाडी) या युवकास बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीची काजू फेणीच्या 48 बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अधिक तपास बांदा पोलिस करीत आहेत. 
 
बांदा - गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर येथील पोलिसांनी कारवाई केली. यात बारा हजार तीस रुपयांच्या दारूसह दहा लाख बारा हजार तीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी टेम्पो चालक व क्‍लिनरवर गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बांदा-दाणोली मार्गावर पहाटे सहाच्या सुमारास करण्यात आली. 

या प्रकरणी नितीन मधुकर चव्हाण (वय 24) व गौरव प्रकाश गणमळे (वय 22, दोघे रा. सांगवडेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले. 

येथील पोलिसांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बेकायदा वाहतुकीवर करडी नजर ठेवली आहे. पहाटे सहाच्या सुमारास बांदा-दाणोली मार्गावर गस्तीदरम्यान गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा टेम्पो (एम. एच. 09 सीयू 6851) आला. ती गाडी थांबण्याचा इशारा केला. गाडीची तपासणी केली असता आत गोवा बनावटीची दारू आढळली. यात एकूण बारा हजार तीस रुपये किमतीची दारू व दहा लाख किमतीची गाडी असा एकूण दहा लाख बारा हजार तीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. 

युवकास अटक... 
बांदा-दाणोली मार्गावरच अन्य एका कारवाईत श्रीरंग प्रमोद सावंत (वय. 33, रा. कोलगाव-निरूखेवाडी) या युवकास बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीची काजू फेणीच्या 48 बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अधिक तपास बांदा पोलिस करीत आहेत. 

Web Title: illegal liquor seized in banda