
India Meteorological Department Forecast : रत्नागिरी जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मारा सुरू झालेला आहे; मात्र जिल्ह्यात कोठेही नुकसान झालेले नाही. जगबुडी, शास्त्री, अर्जुना, कोदवली, काजळी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागानेही पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, मोठ्या लाटा फुटत आहेत.
जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ५१.५९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ४६.५०, खेड ५१.४२, दापोली ५४, चिपळूण ५०, गुहागर ७६, संगमेश्वर ३६, रत्नागिरी ४९.३३, लांजा ४३.६०, राजापूर ५७.५० मिमी नोंद झाली.