esakal | राजापूर: एस.टी. कर्मचाऱ्यावर उदरनिर्वाहासाठी भाजी विकण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर: एस.टी. कर्मचाऱ्यावर उदरनिर्वाहासाठी भाजी विकण्याची वेळ

आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या एस.टी.चे चाक कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अधिकच खोलात रूतले आहे. त्याचा फटका एस.टी. कर्मचार्‍यांना बसून तीन-तीन महिने पगाराची प्रतिक्षा करावी लागत आहे.

राजापूर: एस.टी. कर्मचाऱ्यावर उदरनिर्वाहासाठी भाजी विकण्याची वेळ

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

राजापूर (रत्‍नागिरी) : कोरोना(corona) महामारीमध्ये आर्थिकदृष्ट्या कुचंबणा झालेल्या राजापूर एस.टी. आगारातील चालक तथा वाहक अजय निचल (ajay nichal) यांनी उदरनिर्वाहासाठी स्वतःचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या एस.टी.चे चाक कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अधिकच खोलात रूतले आहे. त्याचा फटका एस.टी. कर्मचार्‍यांना बसून तीन-तीन महिने पगाराची प्रतिक्षा करावी लागत आहे. अशा स्थितीमध्ये श्री. निचल यांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता कोरोनाच्या महामारीमध्ये उत्पन्नासाठी शोधलेला नवा पर्याय निश्‍चितच सुखावह आणि आदर्शवत म्हणावा लागेल. (in rajapur s.t. its time to sell vegetables to employee ajay nichal)

हेही वाचा: राजापूर येथील विलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण गेला कुडाळला 

गेली सलग दोन वर्ष कोरोना महामारी अन् लॉकडाऊन यामुळे गावागावी धावणारी एस.टी. सेवा बंदस्थितीमध्ये त्याचा फटका उत्पन्नाच्यादृष्टीने एस.टी. महामंडळाला जसा बसला त्याप्रमाणे महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनाही बसला आहे. त्यामध्ये श्री. निचल यांचा समावेश आहे.

हेही वाचा: राजापूर तालुक्यातील जानशी, बाकाळे परिसरात ब्लॅक पॅंथरचा वावर ? 

सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले श्री. निचल कला शाखेचे पदवीधर असून त्यांची एस.टी. महामंडळामध्ये रोजंदारी वर्ग-1 मध्ये 2019 मध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर सलग दोन वर्ष कोरोना महामारी राहिल्याने श्री. निचल यांची नोकरीमध्ये कायम होवू शकले नाही. अशाही स्थितीत ते कार्यरत राहीले. मात्र, नियमित न मिळणारे काम आणि वेळेवर न होणारे पगार यामुळे त्यांची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा झाली आहे. त्याच्यातून स्वतःसह आई, पत्नी आणि मुले अशा मोठ्या कुटुंबाचा दैनंदीन खर्च, खोलीचे भाडे वा अन्य खर्चासाठी आवश्यक पैशाची जुळवाजळव करताना त्यांची पुरती दमछाक झाली.

हेही वाचा:  राजापूर तालुक्‍यात पशुधनामध्ये घट 

अशा स्थितीमध्ये त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. शहरातील भटाळी आणि परिसरामध्ये होणार्‍या भाजी विक्रीतून चार पैसे र्थाजनासाठी हातामध्ये मिळत असल्याचे ते सांगतात. या व्यवसायासाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोखले, अविनाश सप्रे, पत्रकार महेश शिवलकर, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय विभागीय कार्याध्यक्ष अनिल कुवेस्कर, प्रसिध्दीप्रमुख मंदार बावधनकर, मजहर शेख, सतीश गायकवाड, सुधाकर काळे आदींचे सहकार्य लाभल्याचे ते सांगतात.

हेही वाचा: राजापूर ग्रामीण रूग्णालयात लसीकरण केंद्राला शुभारंभ; यांना लसीकरणापासून येणार वगळण्यात 

यावेळी अजय निचल म्हणाले, “ एस.टी. महामंडळातील नोकरीने सरकारी नोकरीचे स्वप्न साकार झाले. मात्र, तीन-तीन महिन्यांपासून न मिळणार्‍या पगाराने आर्थिकदृष्ट्या पुरती कुंचबणा झाली आहे. त्यामुळे सरकारी नोकरी असून उपयोग काय ? असा प्रश्‍न सतावत आहे. कोरोना महामारीमध्ये एस.टी. महामंडळामध्ये रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे पुरते हाल झाले आहेत. त्यामुळे महामंडळाने कोरोना महामारीत तरी कर्मचार्‍यांमधील कॅटेगॅरी आणि पगारातील मतभेद संपवून सर्वच कर्मचार्‍यांना किमान वेतन (बेसिक) द्यावे. जेणेकरून त्याचा फायदा कोरोना महामारीत एस.टी. कर्मचार्‍यांचे जीवन किमान सुसह्य होईल.”

loading image