
Student Protest Teacher : रत्नागिरी शहरातील पालिकेच्या निवखोल शाळेत विद्यार्थ्यांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विद्यार्थ्यांविना शाळा सुरू आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात, दमदाटी करतात, असा पालकांचा आक्षेप आहे. त्या शिक्षिकेला बदलल्याशिवाय मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. शाळेचे शैक्षणिक कामकाज बंद असल्याच्या प्रकरणाची चौकशी पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी एस. जे. मुरकुटे यांनी करून त्याचा अहवाल पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे; परंतु अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.