इंदापूर ते पोलादपूर अपघातांत घट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

महाड - मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते पोलादपूर दरम्यान अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने काही वर्षांमध्ये केलेली रस्त्यांची सुधारणा, वाहन चालकांमध्ये नियमांच्या पालनाबाबत आलेली जागरूकता; तसेच महामार्ग पोलिसांतर्फे घेतली जाणारी खबरदारी याचा हा सुपरिणाम मानला जात आहे.

हा महामार्ग २०१० पर्यंत मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात होता. दिवसागणिक या भागात एक तरी अपघात घडतच असे. २००९ व २०१० या दोन वर्षांत ६४७ अपघात झाले. यामध्ये १७० जणांना प्राण गमवावे लागले होते.

इंदापूर ते पोलादपूर दरम्यान अपघातप्रवण क्षेत्रात महामार्ग विभागाने रुंदीकरण केले आहे. महाड विसावा कॉर्नर, दासगाव खिंड, मोहप्रे येथील धोकादायक वळण, केंबुर्ली कॉर्नर, लोणेरे या धोकादायक ठिकाणी रुंदीकरण केले आहे. महाडजवळ पदपथ तयार केल्याने रस्ता सोईचा झाला आहे. अपघातस्थळी पोलिसांनी धोकानिर्देशक फलक लावले आहेत. गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थेची कठोर अंमलबजावणी होते. अवजड वाहनांना बंदी, सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे अपघातांवर नियंत्रण मिळविणे शक्‍य झाले आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. याचा एकत्रित परिणाम म्हणून अपघात कमी झाले आहेत.

Web Title: Indapur to Poladpur the reduction of accidents