भारतीय गोवंश टिकविण्यासाठी चिपळूण तालुक्यातील कामथे येथे गोशाळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

चिपळूण - परदेशी लोकांनी भारतीय गोवंशाचे महत्त्व जाणून येथील गोवंश त्यांनी परदेशात नेले. त्यांच्या जीवनमानात सुधारणा केली. मग मी भारतीय आहे या ठिकाणचे गोवंश टिकविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यात कुठे तरी माझा वाट असावा या प्रेरणेने मी कामथे येथे कामधेनू गोशाळा सुरू करत असल्याची माहिती कामथेचे सरपंच विजय माटे यांनी पत्रकारांना दिली. 

गोशाळा उद्‌घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, वेदकाळापासून मानवी आरोग्याच्या दृष्टीने गाईच्या दुधाचे महत्त्व विशद केले. प्रत्येक भारतीय नागरिकाने समृद्ध आरोग्यासाठी आपल्या भारतीय गोवंशाच्या गायीचे दूध सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. भारतीय गोवंशाच्या दुधाचे महत्त्व जाणून या ठिकाणच्या गोवंशाना सुधारण्यासाठी छोटासा प्रयत्न करीत आहे.

माटे म्हणाले, गीर गाय गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रदेशाच्या परिसरातील ही एक मध्यम आकाराची जात आहे. दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणमध्ये असते. थर्परकर गायीची उत्पत्ती राजस्थानच्या जोधपूर आणि जैसलमेरमध्ये झाली असून तिला ‘मालानी जाती’ असेही म्हणतात. कृष्णाची ही एकच जाणीव थर्परकर ही लोकप्रिय आहे. राजस्थानमध्ये या गायीला ‘कामधेनू’ म्हणतात. या गायीच्या दुधात ५ टक्के चरबी, व्ही व्हिटमिन आणि कॅल्शियम असते. या गाईच्या दुधात ब-याच रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती असते. साहिवाल गाय प्रामुख्याने पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यामध्ये आढळते. दुधाचे उच्च उत्पादन देणारी गाय म्हणून ओळखली जाते. गोशाळेवर आधारित विविध प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. माटे यांनी सांगितले.

Web Title: Indian Domestic cow conservation in Kamthe