सिंधुदुर्गावर फनी वादळाचा प्रभाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

एक नजर

  • बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम सिंधुदुर्गावर.
  • उष्म्याची तीव्रता वाढली असतानाच शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण. 
  • आंबोलीत वळवाचा पाऊस.
  • आजही दिवसभर ढगाळ वातावरण.

सावंतवाडी/आंबोली -  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम सिंधुदुर्गावर दिसू लागला आहे. उष्म्याची तीव्रता वाढली असतानाच शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण झाले. आंबोलीत वळवाचा पाऊसही झाला. आजही दिवसभर ढगाळ वातावरण आहे.

शनिवारी दिवसभर कमालीचा उष्मा होता. बंगालच्या उपसागरात फनी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. हा त्याचा परिणाम असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात चार दिवस उष्णतेची लाट होती. ढगाळ वातावरणामुळे त्यात भर पडली. 

काही भागात काल रात्री पावसाच्या तुरळक सरी पडल्या. आंबोलीत शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान पाऊस झाला. यामुळे काही काळ स्थानिकांना गारवा अनुभवता आला. यानंतर मात्र ढगाळ वातावरण कायम होते. 

जिल्ह्यात काही भागात पावसाचा हलका शिडकावा झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आंध्र प्रदेशमार्गे महाराष्ट्रातील इतर भागांसह कोकणामध्ये हे वारे वाहून येत आहे. याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. 
येत्या दोन दिवसांत पावसाची शक्‍यता कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Influence of cloudy weather on Sindhudurga