...तर मनसे गस्त घालेल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

सावंतवाडी - तालुक्‍यात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना रात्रीची गस्त घालण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तालुका मनसेने आज येथील पोलिसांकडे केली.

दरम्यान, मनसेकडून गस्तीबाबत घेतलेला पुढाकार काळाची गरज आहे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व गस्तीबाबत अधिकृत परवानगी ओळखपत्र देण्यासाठी पोलिस अधीक्षकाकडे प्रस्ताव सादर करणार, असे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले.

गेले काही दिवस शहरात व गावातील काही परिसरात भुरट्या चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. माजगाव बांदा आदी ठिकाणी या घरफोड्या झाल्या यात परप्रांतीयाचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकारांना जबाबदार असणाऱ्या परप्रांतीयांची नोंद पोलिस ठाण्यात ठेवावी. चोऱ्या रोखण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत, या मागणीसाठी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची भेट घेतली. 

परप्रांतीय या ठिकाणी मोठ्या संख्येने रेल्वेने कामानिमित्त येतात व काहीतरी विकायचे या उद्देशाने गावागावांत फिरतात या दरम्यान आसपासच्या गावाची चौकशी करून रात्री घरफोड्या करतात. अशा परप्रांतीयांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलिसपाटलांना अशी  मागणी त्यांनी केली व स्थानिक पोलिस ठाण्यात याबाबत त्यांच्या नोंदी ठेवण्यात याव्यात व ते ज्या राज्यातून आले त्या पोलिस ठाण्यात संपर्क साधून त्यांची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी करत माजगाव व काही ग्रामीण भागातील परिसरात झालेल्या चोरीचा तपास लवकरात लवकर करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या वेळी मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सुधीर राऊळ, संदीप खानविलकर, आशिष सुभेदार, आनंद धोंड, नरेश देऊलकर, विनोद पोकळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: initiative taken by the MNS patrol

टॅग्स