शिवसेनेकडून कोकणवर अन्याय; असे आमदार लाड यांना का वाटते ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

28 ला सरकार स्थापन झाले, 7 नोव्हेंबर उजाडला तरीही खाते वाटप नाही. पण बंगले वाटप करण्यावर समाधान मानले आहे. सावरकर यांना भारतरत्न दिले, म्हणून ज्यांनी विरोध केला, अशा कॉंग्रेसला घेऊन शिवसेना जाणार असेल तर त्यांना ते लखलाभ आहे. पण महाराष्ट्राची जनता भविष्यात हे लक्षात ठेवेल.

रत्नागिरी - भाजपने कोकणच्या विकासासाठी निधी दिला होता, तो शिवसेनेच्या महाविकास आघाडीने रद्‌द केला आहे. दापोली-निजामपूर रस्त्यासह गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी मंजूर शंभर कोटी निधीला स्थगिती दिली आहे. ज्या कोकणाने भरभरुन दिले, त्यांच्यावर शिवसेना अन्याय करत आहे. मुख्यमंत्र्यांनी हे कुठेतरी लक्षात घ्यावे, असे सांगत आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीचे चाक निखळून कधी अपघात होईल, हे सांगता येणार नाही, असे भाकित केले आहे. 

नगराध्यक्षपद पोटनिवडणूक उमेदवार जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, भाजपने लोकहितासाचा प्रयत्न केला असून विकासाची कामे केली आहेत. कोकणाला दिलेला निधी शिवसेनेने थांबवला. कोकणाने शिवसेनेला प्रेम दिले. त्याचा विश्‍वासघात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करत आहेत. कोकणावरील अन्याय दूर करावा, अशीच माझी इच्छा आहे. 
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तिन चाकी रिक्षा घेऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली आहे. त्यातील पवार नावाचा टायर केव्हा पंक्‍चर होईल, तर गांधी नावाचा टायर केव्हा निखळून अपघात होईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे आम्ही फक्‍त आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत. त्यांचा टायर पंक्‍चर करण्याचा प्रयत्न करणार नाही. 28 ला सरकार स्थापन झाले, 7 नोव्हेंबर उजाडला तरीही खाते वाटप नाही. पण बंगले वाटप करण्यावर समाधान मानले आहे. सावरकर यांना भारतरत्न दिले, म्हणून ज्यांनी विरोध केला, अशा कॉंग्रेसला घेऊन शिवसेना जाणार असेल तर त्यांना ते लखलाभ आहे. पण महाराष्ट्राची जनता भविष्यात हे लक्षात ठेवेल. हीच गोष्ट शिवसेनेच्या नेत्यांनीही लक्षात घेतली पाहिजे, असे आमदार लाड यांनी सांगितले. 

हेही वाचा - भाजपकडून रत्नागिरीत नगराध्यक्षपदासाठी यांना उमेदवारी 

विश्‍वास सार्थकी लावू - पटवर्धन 

नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर करुन पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्‍वास सार्थकी लावू. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असा विश्‍वास ऍड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्‍त केला. मी भाजपचा जुना कार्यकर्ता आहे, त्यामुळे सर्वाना बरोबर घेऊन या निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - झटपट निकाल ! विनयभंग प्रकरणी अवघ्या पाच दिवसांत शिक्षा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injustice On Konkan By Shivsena MLA Prasad Lad Criticism