
देवगड : भारतीय नौदलाची ‘आयएनएस गुलदार’ ही निवृत्त युद्धनौका अखेर तालुक्यातील विजयदुर्ग बंदर परिसरात आणण्यात आली आहे. ही युद्धनौका मराठा आरमाराचे मुख्य ठिकाण असलेल्या किल्ले विजयदुर्गच्या परिसरात उभी राहिल्यास असंख्य पर्यटकांची पाऊले इकडे वळतील आणि स्थानिकांना यातून रोजगार मिळू शकेल, अशी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीची मागणी होती. अखेर ही युद्धनौका आज विजयदुर्ग बंदरात विसावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.