मंडणगडचा बदलला भूगोल; ९० शाळा सुगम!

गतवर्षी ९२ शाळा होत्या दुर्गम; तालुक्यातील शिक्षकांना बसणार फटका
inter-district transfer of teachers Changed geography of Mandangad 90 schools
inter-district transfer of teachers Changed geography of Mandangad 90 schools sakal

मंडणगड : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी शासनाने सुगम व अवघड क्षेत्र निश्चित करणासाठी समिती स्थापन केली. या समितीने जिल्ह्यातील शाळांचे क्षेत्र अवघड व सोपे असे वर्गीकरण करून त्यातून बदल्या होणार, असे धोरण असले तरी सुगम अन्‌ अवघड या वर्गीकरणातच घोळ घातला गेला आहे. याचा फटका तालुक्यातील शिक्षकांना बसणार असून, बहुतांशी शिक्षकांच्या तालुक्याबाहेर बदल्या होण्याची शक्यता आहे.

गेल्या वेळी ९२ शाळा दुर्गम होत्या. आताच्या यादीत त्या फक्त २ आहेत. मंडणगडची एवढी प्रगती झालेली बघून सारे आश्चर्यचकीत झाले; पण तालुक्याची प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. तालुक्यातून जाणारा एक राष्ट्रीय महामार्ग, सहा राज्यमार्ग हे दर्जात्मक निकष म्हणून कागदावर असून प्रत्यक्षात जागेवर त्या दर्जानुसार रस्ते अस्तित्वातच नाहीत. रस्त्यांची दुर्दशा असून प्रवास करणे तारेवरची कसरत आहे. बिबट्याचा वावर हा तालुक्यातील विविध पंचक्रोशीत दर्शनीय असून, असंख्य पाळीव जनावरे मारली आहेत. तसेच रात्री दर्शनही घडते आहे. असे असून वनविभागाच्या दफ्तरी त्याची नोंद का आढळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाळीव प्राण्यांवर झालेले हल्ले निकषात घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार समावेश होणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. कार्यक्षेत्रात कामाला गेलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी हे आउट ऑफ नेटवर्क दाखवत असल्याच्या वास्तवाचा अनुभव अनेकवेळा खुद्द प्रशासनाला येत असून ऑनलाइन काम करण्यासाठी मंडणगड गाठावे लागत आहे.

शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी शासनाने सुगम व अवघड क्षेत्र निश्चित करणासाठी समिती स्थापन केली. या समितीने जिल्ह्यातील शाळांचे क्षेत्र अवघड व सोपे असे वर्गीकरण करून त्यातून बदल्या होणार आहेत. मंडणगड तालुका मुळात दुर्गम आहे. शासनाने ७ दिलेले निकष तालुक्यातील अनेक शाळांना लागू होतात. गेल्या वेळी ९२ शाळा दुर्गम होत्या. आताच्या यादीत फक्त २ आहेत. माझी प्रशासनाला विनंती आहे की, या संबंधी वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून निर्णय घ्यावा.

- मनेश शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ मंडणगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com