International Womens Day Special : रायगडची हिरकणी! जिगरबाज तरुणी श्वेता विश्वकर्मा

जीवाची बाजी लावून असंख्य मोहीम व बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका.
shweta vishwakarma
shweta vishwakarmasakal
Updated on

पाली - रायगड जिल्ह्यातील एक जिगरबाज तरुणी श्वेता रेखा संतोष विश्वकर्मा जिने आपल्या धैर्य, कौशल्य व समर्पणाने जीवाची बाजी लावून असंख्य मोहिमा आणि बचाव कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय अनेक वन्यजीवांचे प्राण देखील वाचविले आहेत. तिला रायगडची हिरकणी या उपमेने गौरवण्यात आले आहे.

श्वेता विश्वकर्मा सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (SVRSS) या संस्थेची सदस्या आहे. या संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या विविध बचाव मोहिमांमध्ये तिचा सहभाग असतो. श्वेता विश्वकर्मा हिचा जन्म 30 जानेवारी 2003 रोजी अलिबाग येथे झाला. ती मुळच्या उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील पडकुला गावातील असून, ती आणि तिचे कुटुंब गेली 35 वर्षे कोलाड येथे स्थायिक आहे.

श्वेताने आपले प्राथमिक शिक्षण कोलाड येथील द. ग. तटकरे महाविद्यालयातून पूर्ण केले आणि नंतर गो म वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा येथे भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली. सध्या ती मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स इन इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत आहे.

या क्षेत्रातील आवड व प्रशिक्षण

श्वेताला लहानपणापासूनच वन्यजीव आणि बचाव कार्यांमध्ये रस आहे. तीला काका शरणाप्पा ऐवाळे यांच्याकडून बिनविषारी साप हाताळण्याचे प्रशिक्षण मिळाले. वन्यजीव रक्षक सागर दहिंबेकर यांच्याकडून माउंटनिंग, वॉटर रेस्क्यू, फायर सेफ्टी, इंडस्ट्रियल फायर, फर्स्ट एड आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळाले. ज्या माध्यमातून ती अनेक मोहिमा व बचाव कार्यामध्ये महत्त्वाची धाडसी भूमिका बजावत आहे.

बचाव कार्यातील मोलाचे योगदान

श्वेताने महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील अपघातात ११ जणांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्वेताने साडेतीनशेहून अधिक रस्ते अपघातांमध्ये जखमी लोकांना मदत केली आहे. नदी, उंच कडे, रस्ते अपघात व पूर आदी घटनांमध्ये शेकडो मृतदेह बाहेर काढण्याचे काम तिने ने डगमगता केले आहे. माजी आमदार अनिके तटकरे यांनी रायगडची हिरकणी अशी उपमा दिली.

युवक-युवतींना प्रेरणादायी

श्वेता अनेक नवीन युवतींना बचाव कार्याचे प्रशिक्षण देत आहे. विविध माध्यमातून युवकांमध्ये देशभक्ती आणि समाजसेवेची भावना निर्माण करण्यासाठी ती प्रयत्न करत आहे विविध माध्यमांद्वारे. अनेक तरुणी तिच्याकडे पाहून या क्षेत्रामध्ये उतरत आहेत. तिच्या कार्यामुळे समाजातील अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com