esakal | 'पाटबंधारे प्रकल्पात कोकणाला प्राधान्य'
sakal

बोलून बातमी शोधा

irrigation project priority to kokan jayant patil said in ratnagiri

कोकणाला प्राधान्य देऊन अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले जातील, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

'पाटबंधारे प्रकल्पात कोकणाला प्राधान्य'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद केली होती. परंतु, कोरोनामुळे शासनाचे उत्पन्न तोकडे झाले आणि ही कामे खोळंबली. मात्र, पुढील अर्थसंकल्पात राज्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटींची पुन्हा तरतूद केली जाणार आहे. यात कोकणाला प्राधान्य देऊन अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले जातील, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

हेही वाचा - जयंत पाटलांकडुन तटकरेंची पाठराखण; प्रत्येकाने मर्यादा ओळखुन राहावे -

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, ‘राष्ट्रवादी’ जिल्हाध्यक्ष बाबजी जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, कुमार शेट्ये, बशिर मुर्तुजा, सुदेश मयेकर, नीलेश भोसले आदी उपस्थित होते. ते म्हणाले, जलसंपदा विभागाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्याची बैठक उशिरा आहे. तरी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील पुनर्वसन, फॉरेस्ट आदीचे प्रश्‍न कायम आहेत. याचा आढावा घेऊन आम्ही चालू अर्थसंकल्पात सुमारे १५ हजार कोटीच्या आर्थिक तरतूद केली होती. मात्र, कोरोनामुळे शासनाचे उत्पन्न घटले आणि ही कामे अडचणीत आली.

काही प्रकल्पांची कामे बंद पडली. आम्ही ती नाबार्डकडून कर्ज घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तरी अपूर्ण धरणांची परिस्थिती पाहुन पुन्हा ठोस आर्थिक तरतूद करु. राज्यासाठी पुढील अर्थसकल्पात १५ हजार कोटीची तरतुद करू. यातून राज्यासह जिल्ह्याच्या अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांची कामे पूर्ण करू. जिल्ह्यात अनेक वर्षापासून अपूर्ण असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी एक हजार ८२३ कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी मंजूर झाल्यास या कामांना गती मिळणार आहे. 
 

हेही वाचा - सावधान : फसवणुकीचा नवा फंडा;एक लाख रुपयांना महिन्याला सहा हजार व्याज -

जिल्हा पातळीवरही एकत्र येण्याचा प्रयत्न

जिल्ह्याचा आज राजकीय आढावा घेतला. आपण सत्तेत असल्याने पक्ष मजबूत आणि सक्षम व्हावा, यासाठी प्रभावी कामे करा. अनेक ठिकाणी पक्षाची पडझड झाली आहे. त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम करण्याबाबत जिल्हास्तरावर अजून अडचणी आहेत. स्थानिक प्रश्‍न, मतभेद आहेत. मात्र, ते बाजूला ठेवून जिल्हा पातळीवरही एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top