चाैपदरीकरण प्रश्नः आजच्या जेलभरो आंदोलनावर विरोधक ठाम 

पावशी - विरोधकांच्या जेलभरो आंदोलनाची दखल घेऊन करण्यात आलेली रस्त्याची डागडुजी. 
पावशी - विरोधकांच्या जेलभरो आंदोलनाची दखल घेऊन करण्यात आलेली रस्त्याची डागडुजी. 

कुडाळ - विरोधकांनी जेलभरो आंदोलनाचे हत्यार उगारताच गेल्या चार दिवसांपासून सुप्तावस्थेत असणारी प्रशासन यंत्रणा जागी झाली. रस्त्यातील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया संबंधित विभागाने केली; मात्र उद्याचे (ता.16) जेलभरो आंदोलन होणारच, असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, कॉंग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमित सामंत यांनी दिला आहे. 

चौपदरीकरण पार्श्‍वभूमीवर दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने केलेल्या कामगिरीबाबत विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्ष व ठेकेदाराबाबत संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत या महामार्गाचे काम सुरू असताना कित्येक अपघात झाले. वारंवार प्रशासनाला जागे करूनही काहीच निष्पन्न झाले नाही. याला जागे करण्यासाठीच उद्याचे विरोधी पक्षाचे लोकशाही मार्गाने जेलभरो आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

विकासाच्या दृष्टिकोनात येथील पालकमंत्री निष्क्रिय ठरले आहेत. आज रस्त्याच्या दुर्दशेबाबत प्रवासी, वाहन चालक, सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत आक्रमक पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत सुप्तावस्थेत असलेले प्रशासन जागे होत नाही. म्हणूनच उद्याच्या जेलभरो आंदोलनात सत्ताधारी वगळता इतर सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे. वाहतूक संघटना, ज्यांच्या जमिनी गेल्या ते प्रकल्पग्रस्त, प्रवासी वाहन चालक आदींचा पाठिंबा आहे, असे श्री. उपरकर, श्री. सामंत, श्री. कुडाळकर यांनी सांगितले. 

खड्डे बुजविण्याचे काम 
जेलभरो आंदोलनाची निद्रिस्त प्रशासनाला चाहूल लागताच प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी अलीकडेच चार दिवसापूर्वीच महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी खड्डेमय अवस्था झाली होती तिथे खड्डे बुजवण्याचं काम केले. ज्याठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. चिखलमय रस्ता झाला होता त्याठिकाणी कार्पेटच्या माध्यमातून रस्ता वॉटरप्रूफ करण्यात आला. याबाबतचे सक्त आदेश आमदार नाईक यांनी दिल्यामुळे या यंत्रणेने ही पावले उचलली आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com