महामार्गचाैपदरीकरण : इलेक्‍ट्रिकच्या दुकानाला विस्थापनाचा शॉक 

महामार्गचाैपदरीकरण : इलेक्‍ट्रिकच्या दुकानाला विस्थापनाचा शॉक 

राजापूर - चौपदरीकरणामध्ये विस्थापित झाल्याचा फटका ओणी बाजारपेठेतील गुरुकृपा इलेक्‍ट्रिकचे मालक विनायक राऊत यांना बसला आहे. पंखे दुरुस्तीची मोठ्या प्रमाणात पूर्वी कामे होती. या वर्षी मात्र, दुकानाची जागे बदलल्याने कामच कमी झाले आहे. त्यातून रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर झाला अशा शब्दामध्ये त्यांनी चिंता व्यक्त केली. 

राऊत हे प्रतिनिधिक उदाहरण. चौपदरीकरणामुळे अनेक व्यावसायिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. त्यामुळे त्यांचा लोकांशी संपर्क कमी झाला, गिऱ्हाईकं तुटली. त्यातून व्यवसायही कमी झाल्याने विस्थापित दुकानदारांची आर्थिक घडी विस्कटली आहे. 

आयटीआयचे शिक्षण केल्यानंतर राऊत यांनी ओणी येथील बाजारपेठेमध्ये 2012 मध्ये स्वतःचे दुकान सुरू केले होते. झोकून काम करण्याची वृत्ती, गिऱ्हाईकाचे समाधान करणारे काम आणि मोकळ्या स्वभावाच्या जोरावर त्यांनी बाजारपेठेमध्ये अल्पावधीत जम बसविला.

चौपदरीकरणामध्ये त्यांच्या दुकानाची जागा गेली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ओणी हायस्कूल फाटा येथे बाजारपेठेपासून काही अंतरावर दुकान थाटले. पूर्वी, उन्हाळी हंगामामध्ये पंखे दुरुस्तीचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय असे. वेळच मिळत नसे अशी अवस्था होती; मात्र, महामार्गानजीक असलेले दुकान बाजारपेठेपासून दूर गेल्याचा फटका बसल्याचे ते सांगतात. अन्यत्र दुकान गेल्याबाबत लोकांना फारशी माहिती नाही.

बाजारपेठेपासून नवीन जागेपर्यंत चालत जावे लागते. त्यामुळे गिऱ्हाईक येत नाही. पूर्वीच्या संपर्कातील काही गिऱ्हाईक येतात. व्यवसाय कमी आणि दुकानगाळ्यांच्या भाडेवाढीमुळे बाजारपेठेत जागा भाड्याने घेणे मुश्‍कील झाले आहे. रोजीरोटीसाठी आता फिरती व्यवसाय करावा लागत आहे. त्यातच, उत्पन्नासाठी शेतीसारख्या अन्य पर्यायांचा मार्गांचा शोध घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले. 

महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. बाजारपेठेपासून नवीन जागेपर्यंत चालत जावे लागते. त्यामुळे गिऱ्हाईक येत नाही. पूर्वीच्या संपर्कातील काही गिऱ्हाईक येतात त्यावर आमचे सध्यातरी पोट भरते आहे. 
- विनायक राऊत,
व्यावसायिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com