नगराध्यक्ष सहा महिने रजेवर?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

रत्नागिरी - थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्याच्या विषयाने पालिकेत जोरदार राजकीय खलबते सुरू आहेत. भाजपबरोबर घरोबा करून नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा सुरू आहे. तसेच परिस्थिती सुधारण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकांपर्यत वेळ मारून नेण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना ६ महिन्यांच्या रजेवर पाठवायचा पर्याय निवडला जाण्याची दाट शक्‍यता आहे.

नगरपालिकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राहुल पंडित निवडून आले. 
या निवडणुकाला शिवसेनेतील अनेक उमेदवार इच्छुक होते, मात्र जनतेचा कौल लक्षात घेता एक स्वच्छ आणि शिक्षित चेहरा देण्याचा निर्णय सेनेने घेतला. सेनेचे तालुकाध्यक्ष बंड्या साळवी हेदेखील या उमेदवारीचे दावेदार होते. दोघांना उमेदवारी देणे शक्‍य नसल्याने दोन वर्षांचा कार्यकाल राहुल पंडित आणि पुढील ३ वर्षे बंड्या साळवींना संधी देण्याचा निर्णय पक्षांतर्गत वाटाघाटीमध्ये झाला. त्यासाठी श्री देव भैरी बुवाच्या मंदिरामध्ये शपथ घेण्यात आली. 

ज्या उद्देशाने जनतेने शिवसेनेला निवडुन दिले, तो उद्देश दोन वर्षामध्ये सफल झालेला नाही. शिवसेनेबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या परिस्थितीत पंडित यांचा राजीनामा घेऊन पुन्हा थेट निवडणुकीला जाणे शिवसेनेला सोपे नाही. म्हणून भाजप बरोबर युती करून ही निवडणूक लढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा मात्र सभापती भाजपचे, अशा वाटाघाटी सुरू आहेत. लोकसभेची निवडणूक कधीही लागण्याची शक्‍यता आहे. त्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक लागल्यास दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

उपनगराध्यक्षपद बंड्या साळवीकडे
कायदेशीर बाबी तपासत राहुल पंडित यांना ६ महिन्यांच्या रजेवर पाठविण्यात येणार आहे. उपनगराध्यक्षपद बंड्या साळवी यांच्याकडे देऊन प्रभारी नगराध्यक्ष म्हणून ६ महिने बंड्या साळवी पालिकेचा कारभार हाकून तो सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: issue of Rahul Pandit resignation