esakal | रत्नागिरीत जयगड कळझोंडी पुलाचा भाग ढासळला, घराला गेले तडे
sakal

बोलून बातमी शोधा

Jaigad Kalzondi Part of the bridge collapsed and  two story house collapsed in ratnagiri

पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागल्या पाणी  आले पात्राबाहेर

रत्नागिरीत जयगड कळझोंडी पुलाचा भाग ढासळला, घराला गेले तडे

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसात काल रात्रीच्या सुमारास जयगड कळझोंडी येथील दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. तर जवळच असलेल्या दुमजली घराला तडे गेले आहेत. 
गेले तीन दिवस रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले असून पाणी पात्रा बाहेर आले आहे.

किनारी भागातील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला आहे. तालुक्यातील कळझोडी गणसुरे वाडीकडे जाणारा पुलाचा एक पिलर पूर्णतः कोसळला आहे. याठिकाणी वाहणाऱ्या छोट्या नदीच्या पुरामुळे पिलर ढसाळला असल्याचा अंदाज वर्तवला आहे.या पुलावरील रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा प्रकार काल रात्री घडला.या पुलाच्या शेजारी असणाऱ्या एका दुमजली घराला तडे गेले असून सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत हे घर आहे.

हेही वाचा- रत्नागिरीत चाकरमान्यांच्या प्रवेशासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची सूचना... -

रात्रीच्या सुमारास घराला तडे जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या घरातील कुटुंबाला तात्काळ दुसरीकडे हलवण्यात आले आहे. मुख्य मार्गाकडे जाण्यासाठी येथील लोकांना हा पूल उपयुक्त होता. आता या ग्रामस्थांना खंडाळा मार्गे सुमारे ६ किलोमीटरचा वळसा पडणार आहे. प्रशासनानं घटनास्थळाची पाहणी केली आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

हेही वाचा-रत्नागिरीचे कोव्हीड योद्धे डॉ. दिलीप मोरे यांचे निधन.... -


दरम्यान,  मागील वर्षीच हा पूल खचला होता त्यावेळी जिल्हा परिषदेने तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र याकडे बांधकाम खात्याने गांभीर्याने न बघितल्याने आज ही परिस्थती ओढवली आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image